Maharashtra News Updates 6th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2023 11:54 AM
Beed News: केजमध्ये चंदनाची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, गावठी कट्टा आणि आठ जिवंत काडतूसं पोलिसांकडून जप्त

Beed News: बीडच्या केज तालुक्यातील होळ येथे चंदनाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा जिवंत आठ काडतुस आणि काही धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. हनुमंत घुगे असे आरोपीचे नाव असून तो चंदन विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना रंगी हातात केली असून त्याने लपवून ठेवलेल 45 किलो चंदन देखील पोलिसांनी जप्त केल आहे.

Hingoli News: हिंगोलीतील गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील बासंबा शेत शिवारामध्ये एका शेतकऱ्याने शेतामध्ये गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती हिंगोली च्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून हिंगोली पोलिसांनी काल सापळा रचत कारवाई केली आहे या कारवाईमध्ये शेतामध्ये उपटून ठेवलेला त्याबरोबर काही वाळवून ठेवलेला असा गांजा आढळून आला या कार्यवाहीमध्ये पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे तर दोन आरोपीच्या विरोधामध्ये बासंबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Hingoli News: हिंगोलीतील गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील बासंबा शेत शिवारामध्ये एका शेतकऱ्याने शेतामध्ये गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती हिंगोली च्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून हिंगोली पोलिसांनी काल सापळा रचत कारवाई केली आहे या कारवाईमध्ये शेतामध्ये उपटून ठेवलेला त्याबरोबर काही वाळवून ठेवलेला असा गांजा आढळून आला या कार्यवाहीमध्ये पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे तर दोन आरोपीच्या विरोधामध्ये बासंबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Beed News: बीड मधील सव्वा लाख शेतकऱ्यांनी KYC ची प्रक्रिया पूर्ण न केल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी

Beed News:  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना सहा हजार रुपये प्रति वर्षी लाभ देण्यात येतो बीड जिल्ह्यामध्ये मात्र सव्वा लाख शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे..याच योजनेच्या अंतर्गत 14 व्या हप्त्याचा लाभ मे महिन्याच्या अखेर पर्यंत मिळणार असून बीड जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनी अद्यापही ही केवायसी न केल्याने या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ या शेतकऱ्यांना घेता येनार नाही. त्यामुळे 15 मे पर्यंत गाव पातळीवर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Maharashtra Political News: चर्मकार मेळावा सुरू असतानाच अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra Political News: जळगावातील धरणगावातील चर्मकार समाजाच्या मेळावा सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात बसूनच नागरिकांनी मंत्री गुलाबराव पाटील, आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांची भाषण ऐकल्याच पाहायला मिळालं.


गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ नुकसान सुद्धा झालं आहे. शुक्रवारीही रात्री धरणगाव सह जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला.

 

जळगावातील धरणगाव येथे चर्मकार समाजाचा मेळावा सुरू असताना अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. यात सुरुवातीला काही मान्यवरांची भाषणे झाली. मात्र अवकाळी पावसामुळे इतरांची भाषणे थांबवून कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. शेवटी केवळ प्रमुख अतिथी असलेले माजी मंत्री बबनराव घोलप आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचीच भाषणे झाली. पाऊस सुरू असताना ही नागरिकांनी जागेवरच बसून या दोन्ही नेत्यांची भाषणे ऐकली. यावेळी नेत्यांनीही पावसामुळे भाषण थोडक्यात आटोपले.  मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगतात अवकाळी पावसावर भाष्य करत पावसात बसून भाषण ऐकणाऱ्या नागरिकांचे आभार सुद्धा मानल्याच पाहायला मिळालं.
Parbhani News: परभणीच्या हमदापूर पाटीवर ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात

Parbhani News: परभणीच्या रामेटाकळी जवळील हमदापुर पाटीवर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कुमाच्या चुकीमुळे झाला, हे मात्र कळू शकले नाही. परंतु, घटना घडताच स्थानिक गावकरी मदतीसाठी धावले. 


पुण्याहून परभणी कडे येत असलेली मैत्री ट्रॅव्हल्स ही रामेटाकळी परिसरातील हमदापुर पाटी जवळ आली असता ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरा समोर धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स आणि ट्रॅक दोन्ही वाहनांच्या कॅबिनचा अक्षरशः पूर्णतः चकानाचुर झालाय यात दोन्ही वाहनांच्या चालकांसह इतर 2 जण ही गंभीर जखमी झाले असून 4 ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra News: रत्नागिरीच्या सभेला येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात

Maharashtra News: रत्नागिरीच्या सभेला येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात , काल रात्री इनोव्हा गाडीचा झाला अपघात 


त्यात एका कार्यकर्त्यांचा मृत्यु , दहीसरचे उपशाखाध्यक्ष देवा साळवींचा मृत्यू


तीन जण जखमी , संगमेश्वर येथील रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू

Sangli : सांगलीतील विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

Sangli : सांगलीतील विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. 

परभणीच्या हमदापूर पाटीवर ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चार जण गंभीर

Parbhani Accident : परभणीच्या रामेटाकळी जवळील हमदापुर पाटीवर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला हे मात्र कळू शकले नाही. परंतु घटना घडताच स्थानिक गावकरी मदतीसाठी धावले. पुण्याहून परभणी कडे येत असलेली मैत्री ट्रॅव्हल्स ही रामेटाकळी परिसरातील हमदापूर पाटीजवळ आली असता ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरा समोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स आणि ट्रक दोन्ही वाहनांच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यात दोन्ही वाहनांच्या चालकांसह इतर दोन जण ही गंभीर जखमी झाले असून चार ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीडमध्ये वैद्यनाथ महाविद्यालयासाठी मतदानाला सुरुवात, पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे संघर्ष होणार
Beed News : परळी शहरातील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेले वैद्यनाथ महाविद्यालय ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी धनंजय मुंडे यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. एका न्यायालयीन प्रक्रियेमुळे या महाविद्यालयाची निवडणूक प्रक्रिया रखडली होती. सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच न्यायालयाच्या आदेशाने आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष होणार आहे. दोघांचे पॅनल या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. यापूर्वीच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.
लाल कांद्यापाठोपाठ उन्हाळ कांदा नाफेडने खरेदी करण्याची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची मागणी

Nashik News : लाल कांद्यापाठोपाठ उन्हाळ कांदा नाफेडने खरेदी करण्याची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची मागणी


केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली मागणी


अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडने कांदा खरेदीची मागणी

राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 2022 मध्ये रुपये 351 कोटी रक्कमेचा 2 लाख 38 हजार 196 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. 


यात सरासरी रुपये 1 हजार 475 प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. 


यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत  कांदा खरेदीचे पियुष गोयल यांच्याकडून आश्वासन

शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या सहा हॉटेलवर एकाच वेळी पोलिसांचे छापे

Shirdi News : शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या सहा हॉटेलवर एकाच वेळी पोलिसांचे छापे
15 मुलींची सुटका करत 11 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
श्रीरामपूरचे विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईने वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले
सापळा रचून शिर्डीतील सहा हॉटेलवर एकाच वेळी छापा
श्रीरामपूरचे विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची थेट शिर्डीत कारवाई
शिर्डी पोलीस काय करत आहेत? असा प्रश्न
आरोपींविरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल

Dombivli News: डोंबिवलीत पाण्याच्या पाईपलाईनची पूजा; नांदवलीकरांचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन

Dombivli News: डोंबिवली लगतच्या ग्रामीण भागात नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठ्यामुळे पाणी समस्येला सामोरे जावे लागतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून हे नागरिक पाणी समस्यांनी त्रस्त आहेत.


डोंबिवलीतील नांदिवली टेकडी परिसरामध्ये रस्त्याचे काम सुरू आहे . त्यामुळे पाण्याचे टँकर देखील या परिसरात येऊ शकत नाहीत.काही महिन्यांपूर्वी या परिसरातील अनधिकृत नळ जोडणी वर महापालिकेने कारवाई केली या कारवाईमध्ये ग्रामपंचायत काळापासून असलेल्या नळ जोडण्या देखील तोडण्यात आल्या. या नळ जोडण्याची पाणीपट्टी भरलेली असताना देखील महापालिकेने या नळ जोडण्या तोडल्याचा आरोप येथील नागरिक करतायत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते या निषेधार्थ आज रात्रीच्या सुमारास नागरिकांनी महापालिकेचे पाईपलाईनची पूजा करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले महिलांनी रस्त्यावर उतरून चक्क पालिकेच्या पाईपलाईन मध्ये पाणी कधी येईल महाराजा अशा  घोषणा देत पाईपलाईनची पूजा अर्चना केली. 
Maharashtra News: मानवी तस्करी रॅकेटचा उलगडा, चार जण अटकेत

Maharashtra News: श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांच्या टोळ्या या मानवी तस्करी करून त्यांना डांबून ठेवून, मारहाण करत वेठबिगारी करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल असून चौघांची सुटका करण्यात आली आहे... या घटनेत मानवी तस्करी करत इतर राज्यातील मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणून त्यांच्याकडून घरची आणि शेतातील काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला , तर काही ठिकाणी रेल्वे स्टेशनवर अशा लोकांकडून भीक मागून घेतले जात असल्याच पोलीस तपासात समोर आला आहे... याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी पिलाजी भोसले, अमोल भोसले , अशोक भोसले, गंज्या काळे या आरोपींना ताब्यात घेतला आहे...दोघांचा शोध पोलीस घेत असून आरोपींच्या ताब्यातून सलमान उर्फ करणकुमार आत्मजनेहरू (छत्तीसगड),  ललन सोपाल  (बिहार) , भाऊ मोरे (बीड) , श्री शिव (कर्नाटक) यांची सुटका करण्यात आलीये...परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळ्या लोकांना पाच-पाच हजारात महाराष्ट्रात विकले जाता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यात आणखी मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये.

Yavatmal News: वीज चोरीप्रकरणी साडेतीन लाखांचा दंड जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल

Yavatmal News: वीज चोरी करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने साडेतीन लाखांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश गौरी कवडीकर यांनी दिला.


प्रकाश अवधुत सोनोने रा. चमेडीयानगर, भारत सेवा आखाडा, यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. 10 फेब्रुवारी रोजी वीज वितरणच्या भरारी पथकाने आरोपीच्या वेल्डींग वर्क शॉपवर धडक देत विद्युत मिटर व संचाची पाहणी केली. यावेळी त्यामध्ये एक सिंगल फेजचे एचपीएल कंपनीचे मिटर लावले असल्याचे दिसले. विद्युत जोडणीचे व त्याचे देयक किती भरले, अशी विचारणा केली असता कागदपत्रे दिली नाही. त्यामुळे वीजपुरवठा बंद करण्यात आला. आरोपी नकली मीटरद्वारे केबल वायर करून ते खरे असल्याचे भासवित असल्याने आढळून आल्यावर भरारी पथकातील दक्षता अधिकाऱ्यांनी चोरी उघड केली. या कालावधीमध्ये 8852 विद्युत युनिटची चोरी केल्याचे दिसताच 1 लाख 17 हजार 140 रुपयांचे बिल दिले. परंतु आरोपीने हा प्रस्ताव न मानल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला.  आरोपीचा हा पहिलाच गुन्हा असल्याने विद्युत कायद्याचे कलम 135 अंतर्गत 10 व्हॅटपेक्षा कमी विद्युत चोरी केल्याने त्याला विद्युत चोरीची रक्कम 1 लाख 17 हजार 14 च्या तीनपट म्हणजे 3 लाख 51 हजार 420 रुपये रकमेचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा आरोपीस विद्यमान न्यायालयाने ठोठावली. 
Dombivli News: डोंबिवली मापात पाप करणाऱ्या फेरीवाल्याला मारहाण करून पळवले, व्हिडिओ व्हायरल

Dombivli News: अनेक वर्षापासून डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्याचा प्रश्न जैसे थे असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचे अल्टिमेट गेल्या महिन्यात दिले होते त्यानंतर स्वतः आमदार राजू पाटील हे मन सैनिकांसह फेरीवाला हटाव साठी रस्त्यावर उतरले होते, त्यानंतर 15 ते 20 दिवस डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला होता, आता मात्र पुन्हा फेरीवाल्याने आपले बस्तान मांडले आहे, अशाच एका द्राक्ष विकणाऱ्या फेरीवाल्याने चक्क डोंबिवली रेल्वे स्टेशन ला जोडलेल्या स्काय वाक वरच आपले बस्तान मांडून ग्राहकांना द्राक्ष देताना मापात माफ करत असल्याचे दिसून आले, विशेष म्हणजे काल दुपारच्या सुमारास एक ग्राहकाने द्राक्ष विकणाऱ्या फेरीवाल्याकडे दीड किलो द्राक्ष विकत घेऊन त्याचे पैसेही दिले होते, मात्र काही वेळानंतर त्या द्राक्षाचे इतर ठिकाणी वजन केले असता 800 ग्रामच होते, त्यामुळे तो ग्राहक पुन्हा या द्राक्ष विकणाऱ्या फेरीवाल्याकडे येऊन मोबाईल मध्ये चित्रीकरण करत त्याच्या मापात पाप करण्याचा गोरख धंद्याच उघडकीस आणून त्याला चांगला चोप दिला, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच वायरल झाला असून पुन्हा एकदा फेरीवाला विरुद्ध ग्राहकांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरांमध्ये महापालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त करून महापालिकेचे अधिकारी फेरीवाल्याकडून कसे हप्ते गोळा करतात या लेखाजोखावर चर्चा करताना दिसत आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


6th May In History: सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांचे निधन, मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशी; आज इतिहासात


6th May In History: आजचा दिवस हा देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं. तर 26 नोव्हेंबर 2011 सालच्या मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबलाही आजच्याच दिवशीस फाशी देण्यात आली होती. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी.


1856 : आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म


सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) हे प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, वैद्य आणि मनोविश्लेषणाचे प्रणेते होते. सिग्मंड फ्रॉइड यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले. विसाव्या शतकातील एक थोर विचारवंत म्हणून फ्रॉइड यांचे स्थान आहे. त्यांनी मानवी मनाबाबत मांडलेल्या संकल्पनांमुळे मानवी स्वभावाबाबतच्या पारंपारिक कल्पनांमध्ये फार मोठी उलथापालथ झाली. 


1857 : ब्रिटिशांनी उठाव करणारी 34 वी रेजिमेंट बरखास्त केली


ब्रिटिशांनी आणलेल्या नव्या एन्फिल्ड बंदुकीच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली असल्याचा आरोप होता. त्याविरोधात मंगल पांडे यांने सैन्यात उठाव केला. त्यानंतर बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्रीची 34 वी रेजिमेंट बरखास्त करण्यात आली. नंतरच्या काळात बंगालमध्ये 1857 च्या उठावाला सुरुवात झाली आणि त्याचा प्रसार संपूर्ण देशभर झाला. 


Horoscope Today 6 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य


Horoscope Today 6 May 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कन्या राशीचे लोक जे घरापासून दूर नोकरी करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कसा असेल शनिवारचा दिवस मेष ते मीन, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.