Maharashtra Live Updates : वर्धामध्ये मुसळधार पाऊस; हिंगणघाट बाजार समितीमधील शेतमाल भिजला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Apr 2023 10:43 PM
Mumbai: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाणार; संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करणार

Mumbai: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाणार; संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करणार 

Thane Kalyan News: भर रस्त्यात तलवारीने वार करत दोन तरुणांना केले जखमी; नांदिवलीतील घटनेने खळबळ

Kalyan News:  जुन्या वादातून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत चार जणांनी भर रस्त्यात तलवारीने वार करत दोन तरुणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण नांदीवली परिसरात घडली 

Wardha News: वर्धामध्ये मुसळधार पाऊस; हिंगणघाट बाजार समितीमधील शेतमाल भिजला

Wardha News: वर्ध्याच्या हिंगणघाट येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेला शेतमाल भिजला. पावसाचा अंदाज असताना देखील बराचसा शेतमाल उघड्यावर राहिला होता. 

बारसू रिफायनरीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा

बारसू रिफायनरीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा


आंदोलक सत्यजित चव्हाण आणि त्यांच्या टीम सोबत चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली


आंदोलकांकडून शरद पवार यांच्याशी रिफायनरी का नको यासाठी मागील तासाभरापासून चर्चा


बैठकीला जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित

जळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी

जळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी झाले  असून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पॅनल एका जागेने आघाडीवर आहे. तर  मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजप शिंदे गटाचे सहकार पॅनल चे ८ उमेदवार विजयी झाले असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


या ठिकाणी महाविकास आघाडी व भाजप शिंदे गटांमध्ये काटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिकृत निकाल घोषित होणे बाकी आहे.

बोदवड बाजार समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता, एकनाथ खडसेंनी गड कायम राखला...

जळगाव बोदवड बाजार समिती


बोदवड बाजार समितीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता


राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी गड कायम राखला...


विद्यमान शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का..


18 पैकी 16 जागांवर एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलचां विजय



बोदवड बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना त्यांचा गड कायम राखण्यात यश मिळाला आहे 18 पैकी 16 जागांवर एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनल विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


दोन जागांसाठी अद्याप मतमोजणी सुरू असून
अधिकृत निकाल हाती येने बाकी आहे.


गेल्या 30 दिवस 35 वर्षांपासून बोदवड बाजार समिती ही या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व कायम आहे. भाजपातून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम असल्याचं त्या निकालातून दिसून आला आहे.  मोठ्या फरकाने महाविकास आघाडीने त्यांच्या पॅनलचा पराभव करत धूळ चारली आहे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेसह जुन्या मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेसह जुन्या मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी


बोरघाटात वाहतूक कोंडी आणि धीम्या गतीने वाहतुकीमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम


एक्स्प्रेसवेवरुन पुण्याकडे जाताना 10 किलोमीटर वाहतूक कोंडी


अनेक छोटी वाहने गरम झाल्यामुळे आणि बिघाडामुळे रस्त्यात बंद पडल्याने प्रवासी हैराण


अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, आपदा मित्र, IRB यंत्रणा तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते मदतीला

राष्ट्रवादी मराठी कलाकार संघटनेची शरद पवार यांच्यासोबत बैठक

राष्ट्रवादी मराठी कलाकार संघटना आज शरद पवार यांच्यातील बैठक संपली 


बैठकीत कलाकारांची मराठी चित्रपट सृष्टील उद्योगाचा दर्जा द्यावा, ज्येष्ठ कलाकारांच्या शासकीय मानधनात वाढ करण्याची मागणी


3200 रुपये आता मानधन देण्यात येते ते मानधन 15 ते 20 हजार करण्याची मागणी


लावणी सेन्सॉर करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली


लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मनोरंजन वाहिन्यांचे प्रमुख, सांस्कृतिक खात्याचे मंत्री, सचिव आणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याच शरद पवार यांचं आश्वासन

राष्ट्रवादी मराठी कलाकार संघटनेची शरद पवार यांच्यासोबत बैठक

राष्ट्रवादी मराठी कलाकार संघटना आज शरद पवार यांच्यातील बैठक संपली 


बैठकीत कलाकारांची मराठी चित्रपट सृष्टील उद्योगाचा दर्जा द्यावा, ज्येष्ठ कलाकारांच्या शासकीय मानधनात वाढ करण्याची मागणी


3200 रुपये आता मानधन देण्यात येते ते मानधन 15 ते 20 हजार करण्याची मागणी


लावणी सेन्सॉर करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली


लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मनोरंजन वाहिन्यांचे प्रमुख, सांस्कृतिक खात्याचे मंत्री, सचिव आणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याच शरद पवार यांचं आश्वासन

Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा 


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज 


विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 


गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता 


मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातुरात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज 


मुंबई आणि ठाण्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 


सकाळी मुंबईतील काही ठिकाणी हलका पाऊस

Pune Traffic : जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर, टॉम टॉम या कंपनीकडून वाहतूक कोंडीचा अहवाल प्रसिद्ध

Pune Traffic : जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर


जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करुन एका खाजगी संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला 


टॉम टॉम या कंपनीने वाहतूक कोंडीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे


पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतेय वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते 


भारतातील तीन शहरांचा समावेश 


बंगळुरु जगात दुसऱ्या क्रमांकावर पुणे सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर 


10 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरुन काढला निष्कर्ष 


पुण्यात 10 किमी अंतर जाण्यासाठी 27 मिनिटं लागतात

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी 80 टक्के उपस्थिती

MPSC Exam : आज 30 एप्रिल, 2023 रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली. प्रस्तुत परीक्षेकरता एकूण 4,67,085 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठकव्यवस्थेकरता राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1,475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरता साधारणपणे 80% उपस्थिती असल्याचे दिसून आले. या परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण 8,169 पदे भरली जाणार असून आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे. तसेच अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

पाटोदा मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत राडा, आमदार सुरेश धस यांच्या समोरच मारहाण
मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत राडा

 

पोलिंग एजंटला पोलिसांची मारहाण

 

पाटोदा मतदान केंद्रावरील प्रकार

 

आमदार सुरेश धस यांच्या समोर मारहाण

 

पोलीस आणि कार्यकर्ते भिडले
भिवंडी घटनेप्रकरणी इमारत मालक ताब्यात, पोलिसांनी केला गुन्हा दाखल
भिवंडी इमारत घटना

 

 नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

 

 त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (२), ३३७, ३३८ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 इंद्रपाल पाटील असे ताब्यात घेतलेल्या मालकाचे नाव आहे.

 

 पोलिस सूत्रांनी सांगितले की, पाटील यांनी २०१४ मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश दुकान व रहिवासी भाड्याने दिले आहेत.

 

 नारपोली पोलीस त्याला लवकरच अटक करणार आहेत.
भिवंडी इमारत दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात वर्धमान इमारत अचानक कोसळल्याने इमारतीचा ढिगार्‍याखाली 22 जण अडकले असून आत्तापर्यंत 14 जणांना बाहेर काढण्यात आले असून दहा जण जिवंत तर चार जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे


विशेष म्हणजे या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या सुनील पिसाळ या इसमाला एनडीआरएफच्या जवानांनी तब्बल वीस तासानंतर जिवंत बाहेर काढल आहे 


सुनील पिसाळ याचा आज वाढदिवस असून एनडीआरएफ जवानांनी त्याला वाढदिवसाच्या दिवशी नवीन जीवनदान दिल्याने त्यांनी एनडीआरएफचे जवान व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले


सुनील पिसाळ  वीस तास या इमारतीच्या ढिगाराखाली होता त्याने आपला बचाव करण्याकरता इमारतीत काचाचा  ढिग असलेल्या भागात बसून आपला बचाव केला बाहेर निघण्यासाठी त्यांनी अनेक वेळा आवाज लावले त्यांनी यावेळी अपेक्षा देखील सोडून दिली होती परंतु एनडीआरएफच्या एका आवाजाने त्याने जवानांना जोरजोरात आवाज देऊ लागला तब्बल वीस तास सुरू असलेल्या या बचाव कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी वीस तासानंतर सुनील पिसाळला जिवंत बाहेर काढलं त्यावेळी एकच जल्लोष ऐकू आला सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या नवीन जीवनाचा शुभेच्छा दिल्या तर सुनील याने हात जोडत एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले तसेच रात्रभर त्याचा भाऊ त्याचे कुटुंबीय त्याचे मित्र सवंगडे सर्वजण हिम्मत न हारता उभे होते त्याची वाट पाहत होते आणि अखेर तो जिवंत आल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले

यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Yavatmal : यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे सहा वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. सतत दोन तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. ढगाळ वातावरणामुळं जिकडे तिकडे अंधाराच अंधार आहे. जिल्हा प्रशासनाने दिले शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.


 

परभणीच्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ज्वारी, हळद आणि फळपिकांचे नुकसान

Parbhani Rain : अवकाळी पाऊस वादळी वारे थांबायचं नाव घेत नसून काल रात्री आणि आज पहाटे परभणीच्या इंदेवाडी, पोखर्णी, दैठणा परभणी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळं अनेक घरावरची पत्रे उडाली असून झाडेही ऊन्मळून पडली आहेत. इंडेवाडीमधील ब्रम्हपुरी तांड्यावरील दोन घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे. 3 जनावरे गंभीर जखमी झाली आहेत.या वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, हळद आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. 

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून राम मंदिरात आरती

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून राम मंदिरात आरती



शनिवार वाडा भोसलच्या तीनशे मीटर परिसरात तीन मिळकतींना बांधकामाची परवानगी मिळावी यासाठी आरती



शनिवार पेठेतील श्री जोशी राम मंदिरात  आमदार रवींद्र धंगेकर यांचे प्रभू श्रीरामाला साकडे

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरती बर्निंग कारचा थरार

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरती बर्निंग कारचा थरार


पुण्याच्या दिशेने जाताना घाटात अचानक कारला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी


जवळपास आठ ते दहा किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा


वीकेंडसाठी मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, नदी नाल्यांना पूर

Buldhana Rain : काल सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाणा तालुक्यातील धाड, वरुड परिसरात नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. रात्रीही बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला आहे. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. तर बुलढाणा शहरालगत असलेला सह्याद्री डोंगराच्या रांगाही आता हिरव्यागार होत असल्याचं चित्र एन उन्हाळ्यात बघायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणातून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. सध्या दुबार उन्हाळी भात शेती चांगली आहे. तर दुसरीकडे वीट भट्टी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं पुन्हा अचानक सुरू झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांसह वीट भट्टी व्यावसायिक ही धास्तावले आहेत.

नागपूरकर अनुभवतातेयत मान्सून पूर्व वातावरणाचा फील, ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

Nagpur Rain : एप्रिल, मे च्या कडक उन्हाच्या दिवसात ज्या प्रकारे सतत अवकाळी पाऊस कोसळत आहे त्यामुळे जून महिन्याच्या मान्सून पूर्व वातावरणाचा फील नागपूरकर अनुभवताना दिसत आहे . मागच्या 10 दिवसापासून जिल्ह्यात सतत कुठेना कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे . आज तर सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने नागपूरकरांना छत्री बाहेर काढण्याची वेळ आली आहे .

भिवंडीत इमारत दुर्घटनेत तब्बल 20 तासानंतर एकाला जिवंत बाहेर काढण्यात यश

Bhivandi : भिवंडीत इमारत दुर्घटनेत तब्बल वीस तासानंतर एकाला जिवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफ टीमला यश आले आहेत. 22 जणांपैकी 13 जणांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर 10 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून धावणार पहिली ई-शिवनेरी, उद्या होणार लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून धावणार पहिली ई-शिवनेरी 


उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे-पुणे महामार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीचे लोकार्पण होणार 


आठ ई-बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल 


मुंबई-पुणे महामार्गावरील सर्व व्हाॅल्वो शिवनेरी बाद करत ई-शिवनेरी आणल्या जाणार 


दादर-स्वारगेट, दादर-पुणे स्टेशन, ठाणे-स्वारगेट, स्वारगेट-बोरिवली महामार्गावर येत्या काही महिन्यात ई-शिवनेरी धावतील 


एकूण १५० ई-शिवनेरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार, पर्यावरणपूरक गाड्या असल्यानं प्रदूषण कमी होणार 


सोबतच ई-शिवनेरीत अत्याधुनिक सोयी सुविधा 


सध्या शिवनेरी पुणे ते ठाणे ५१५ रुपये तिकीट, मात्र सुरुवातीला भाडं कमी करत प्रवाशांना फायदा महामंडळाकडून दिला जाणार नसल्याची माहिती 


जोपर्यंत सर्व गाड्या बदलल्या जाणार नाहीत आणि आॅपरेशन काॅस्ट कमी होणार नाही तोपर्यंत तिकीट दर जैसे थेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती

भंडाऱ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी....

Rain :  हवामान विभागाच्या अंदाजानुसार मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. काल मध्यरात्रीनंतर भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा शेतातील पिकांना फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील काही दिवसांपासून प्रखर उष्णतेनं नागरिक हैराण झाले होते. अवकाळी पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे

पालकमंत्री विखे पाटलांच्या मध्यस्तीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे

साईबाबा मंदिर परिसरात CISF सुरक्षेच्या मुद्यावरून पुकारलेला शिर्डी बंदचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आलाय. याबाबत उच्च न्यायालयात याचिका करण्याचा निर्णय सुद्धा झालाय. मात्र, CISF सुरक्षेची मागणी करणारा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून गेल्या रामनवमी उत्सवात काही ग्रामस्थ व माजी विश्वस्तांनी उत्सव ताब्यात घेतला असल्याबाबत साईबाबा संस्थान अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश यांचा अहवालात समोर आलाय. तर कृषीमंत्र्यांनी सुद्धा पत्र लिहून सुरक्षेच्या कारणासाठी पत्र लिहिल्याच स्पष्ट झालंय. त्यामुळं उच्च न्यायालयानं सुद्धा याबाबत पोलीस अधीक्षकाना म्हणणं मांडण्यास सांगितले आहे. आता याबाबत ग्रामस्थ सुद्धा ग्रामसभा घेऊन न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी करत असून दुसरीकडे याबाबत उच्च न्यायालयात लवकरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळं CISF च्या सुरक्षेच्या मुद्यावरून लवकरच पुन्हा शिर्डीतील वातावरण तापण्याची चिन्हेआहेत हे मात्र नक्की

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


APMC Election Result Live Updates  : बाजार समित्यांच्या निवडणुकीत कौल कोणाला? आज स्पष्ट होणार  


APMC Election 2023 Result Live Updates : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Agricultural Produce Market Committee) रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी मतदान प्रक्रिया होऊन निकालही जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पारपडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.


दरम्यान, या बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसल्याचे चित्र आहे. राहिलेल्या ठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे.  


राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस


राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटता सापडले आहेत. राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे. 


बुलढाणा जिल्ह्यात रात्री अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा आहे.  बुलढाण्यात आजचं तापमान हे 15.2 अंश सेल्सिअस आहे. थंड हवेमुळं मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुलढाण्यात गेल्या 70 वर्षात एप्रिल महिन्यातील आजचं नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.


Weather : राजधानी दिल्लीसह देशातील 'या' राज्यात पावसाचा इशारा, उष्णतेपासून मिळणार दिलासा, वाचा हवामान विभागाचा अंदाज 



Weather Update Today : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. या अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं राजधानी दिल्लीसह (Delhi) भारतातील इतर राज्यात पुन्ह अवकाळी पावासाचा इशारा दिला आहे. यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळं देशातील उत्तरेकडील राज्यांसह अनेक ठिकाणी वातावरण आल्हाददायक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या.  नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. मात्र, आता या कडक उन्हापासून आणि दमट उकाड्यापासून सुटका होण्याची आशा आहे. अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमालयीन राज्यांमध्ये पावसासोबत हिमवर्षावही होऊ शकतो. उत्तरेकडील भागात जोरदार वाऱ्यासह पावसामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. या दिवसांत केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनाही तेथे सतत बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.