Football Match In Kerela : केरळमध्ये मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. मलप्पुरम जिल्ह्यातील एरिकोड शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान लागलेल्या आगीत 50 हून अधिक प्रेक्षक होरपळले. सामना सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. सामन्यापूर्वी आयोजकांनी येथे जोरदार आतषबाजीचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, फटाके नियंत्रणाबाहेर गेले आणि स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये फुटू लागले. अशा स्थितीत गोंधळ उडाला. या अपघातात दोन प्रेक्षक गंभीररित्या भाजले असले तरी या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे सुदैवाने असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एरिकोड पोलिसांनी काय सांगितले?
एरिकोड पोलिसांनी सांगितले की, मलप्पुरम जिल्ह्यातील एरिकोड भागातील एका स्टेडियममध्ये 'सेव्हन्स' फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यादरम्यान फटाक्यांमुळे 50 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींपैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर लोकांच्या जखमा गंभीर नाहीत. सामन्यापूर्वी फटाके फोडले जात असताना हा अपघात झाला. मैदानाजवळ बसलेल्या प्रेक्षकांमध्ये फटाके पडल्याने लोक पेटले. आयोजकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 288 (स्फोटक पदार्थाबाबत निष्काळजीपणा) आणि 125 (बी) (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना होता
थेरट्टम्मल, एरिकोड येथे सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेचा हा अंतिम सामना होता. त्यामुळे प्रचंड आतषबाजी करण्यात आली. अंतिम सामना 'युनायटेड एफसी नेल्लीकुथ' आणि 'केएमजी मावूर' यांच्यात होणार होता. या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या