Maharashtra News Updates 2nd May 2023 : वाशिम जिल्ह्यात दुपारपासून पावसाची हजेरी; अवकाळीने शेतकरी-व्यापारी चिंतेत

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 May 2023 10:35 PM
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मार्गावर भीषण अपघात; बसच्या धडकेने दुचाकीस्वार 2 युवकांचा मृत्यू
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मार्गावर भीषण अपघात झाला असून बसच्या धडकेने दुचाकीस्वार 2 युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पांढरपौनी वळणाजवळ कोलवॉशरीमधील कामगारांची दुचाकी अचानक बस पुढे आल्याने हा अपघात झाला. बस चालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या केलेल्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव 31 वर्षीय संदीप सिंह असे आहे. तर अन्य एकाची ओळख पटणे बाकी आहे. राजुरा पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 
Bhandara News: भंडाऱ्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी....सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदील

Bhandara News: आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे आधीच शेतकरी कंटाळलेला असताना आज पुन्हा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तालुक्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं आर्थिक संकटात सोपडला आहे.

Sharad Pawar: बारामती येथील शरद पवारांच्या 'गोविंद बाग' निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Sharad Pawar:  बारामती येथील शरद पवारांच्या 'गोविंद बाग' निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केली काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामासुद्धा दिला तर मुंबईत काही कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवारांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

Washim News:  वाशिम जिल्ह्यात दुपारपासून पावसाची हजेरी; अवकाळीने शेतकरी-व्यापारी चिंतेत

Washim News:  वाशिम जिल्ह्यात आज पुन्हा दुपारपासून अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. मार्च-एप्रिलनंतर मे महिन्यातही अवकाळीचा कहर सुरू असल्याने  शेतकऱ्यांसह व्यापारी  चिंतेत सापडले आहे

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय : शरद पवार

हसन मुश्रीफांना अटकेपासून दिलेला दिलासा कायम

हसन मुश्रीफांना अटकेपासून दिलेला दिलासा कायम


20 जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला निर्देश


मनी लाँड्रिंग प्रकरणी मुश्रीफांसह त्यांच्या कुटुंबियांविरोधात सुरू आहे तपास

Parbhani News: परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया वरून राजकारण तापलं

Parbhani News: परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्ताव रद्द झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार आमदार विरुद्ध भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्यात गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.


उद्धव सेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला अडचणी येऊ नयेत म्हणून अनेक त्रुटी ठेवून खासदार संजय जाधव अन आमदार राहुल पाटील यांनीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव रद्द करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलाय तर आम्ही आमच्या सरकार विरोधात आंदोलन करून हे वैद्यकीय महाविद्यालय मिळवले आहे ते होऊ नये म्हणुन शिंदे गटाचे नेते परभणीचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत हे आणि भाजप आमदार मेघना बोर्डीकर या प्रयत्नशील असुन कायम विकासाच्या आड हे शिंदे, भाजपचे नेते येत असल्याचा आरोप करत हिम्मत असेल तर आता परत यांनी यांच्या सरकार कडून हे वैद्यकीय महाविद्यालय परत आणावे असे आव्हान उद्धव सेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिले आहे. 

Arun Gandhi Passes Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Arun Gandhi Passes Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला आहे.  दोन महिन्यांपासून अरुण गांधी हे कोल्हापुरात  वास्तव्यास होते

सुदाम कोंबडे स्वगृही परतणार, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश करणार  

Nashik News :  मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे स्वगृही परतणार


आज मुंबईत मनसेत करणार पक्षप्रवेश 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थवर 11 वाजता होणार प्रवेश


सुदाम कोंबडे मनसेतून 2017 मध्ये भाजपात आले होते 


मनपाची निवडणूक लढविल्यानंतर भाजपामध्ये होते सक्रिय 


आता पुन्हा मनसेत करणार प्रवेश


15 दिवसांपूर्वी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात वाढल्या हालचाली

भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Nagpur News : भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये उद्या मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. उद्या भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा पातळीवर संघटनात्मक बदल मे महिन्यात जाहीर केले जातील अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Nagpur News : भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये उद्या मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. उद्या भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा पातळीवर संघटनात्मक बदल मे महिन्यात जाहीर केले जातील अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Nagpur News : भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये उद्या मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. उद्या भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा पातळीवर संघटनात्मक बदल मे महिन्यात जाहीर केले जातील अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

ताडोबा इथे व्याघ्र पर्यटनाला आलेल्या पर्यटकाचा सफारी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताडोबा इथे व्याघ्र पर्यटनाला आलेल्या पर्यटकाचा सफारी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.


केशव रामचंद्र बालगी (वय 71 वर्ष) असे पर्यटकाचे नाव असून ते मुंबई येथील काळा आंबा परिसरातील रहिवासी होते.


प्रकृती खालावल्याने पर्यटक मार्गदर्शक आणि वाहकाने त्यांना माळस येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले 


सलग सुट्ट्या आल्याने ते आपल्या कुटुंबासोबत ताडोबा येथे पर्यटनाला आले होते 


वन विभागाचे अधिकारी पीएल चव्हाण यांनी ही माहिती दिली.

फुकटात कोल्ड्रिंक आणि नाश्ता न दिल्याने टोळक्याकडून मिठाई व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Nashik News : नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, गोळीबार, प्राणघातक हल्ले, लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फुकटात कोल्ड्रिंक आणि नाष्टा दिला नाही म्हणून सहा-सात जणांच्या टोळक्याने मिठाई व्यावसायिकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सातपूर परिसरात समोर आली आहे. अंबिका स्वीट्स रविवारी सायंकाळी घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी केली जातं आहे.

वर्ध्यात पोल्ट्री फॉर्ममधील एक हजारांपेक्षा जास्त कोंबड्याचा मृत्यू

Wardha News : वर्ध्याच्या हिंगणघाट येथील पिंपळगाव शिवारात गारपीट झाल्याने पोल्ट्री फॉर्मवरील पाण्याच्या टाकीसह टिनपत्रे उडाली. इथे पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या सुमारे एक हजार कोंबड्यांचा यात मृत्यू झाला. तरुण शेतकरी अक्षय गिलोरकर याने मोठ्या उमेदीने उभारलेल्या पोल्ट्री व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

महिला पोलिस हवालदाराचा कर्तव्यावर हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू, भंडाऱ्याच्या आंधळगाव इथली घटना

Bhandara News : पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना एका महिला पोलीस हवालदारचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्यात घडली. प्रज्ञा मोहनलाल चव्हाण (वय 35 वर्षे रा. आंधळगाव) असे मृत महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्या 2008 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. आंधळगाव पोलीस ठाण्यात रात्री कर्तव्यावर असताना प्रज्ञा चव्हाण यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे उपस्थित सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असता, वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट, सायबर पोलिसात तक्रार दाखल

Pune DM Fake Facebook Account : पुणे जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट 


पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट 


राजेश देशमुख यांनी या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली आहे


सायबर चोरट्यांनी "माही वर्मा" या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केले असून त्या अकाऊंटवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले


या अकाऊंटवरुन देशमुख यांच्या मूळ अकाऊंटवरील अनेकांना पाठवण्यात आली आहे "रिक्वेस्ट"


याआधी 2 वेळा राजेश देशमुख यांचे नाव वापरून काही अज्ञातांनी फेसबुक अकाऊंट तयार केले होते


नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवर कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे केले आवाहन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना 31 मे पर्यंत रत्नागिरी जिल्हा बंदी 

Ratnagiri Police Notice To Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी 


बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासही घातली बंदी 


रत्नागिरी पोलिसांकडून रात्री उशिरा राजू शेट्टी यांना देण्यात आली नोटीस 


राजू शेट्टी यांना 31 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंदी 


बंदी आदेश पाळला गेला नाही तर गुन्हा दाखल करण्याचा दिला इशारा

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha: 6 मे रोजी रत्नागिरीतील बारसू दौऱ्यावर, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha: उद्धव ठाकरेंनी सरकारवर कसा हल्लाबोल केला. 6 मे रोजी रत्नागिरीतील बारसू दौऱ्यावर, त्यानंतर महाडच्या सभेला जाणार, बीकेसीतील भाषणात उद्धव ठाकरेंनी केली घोषणा.

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha: मुंबईतील बीकेसीच्या मैदानात, महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली

Mahavikas Aghadi Vajrmuth Sabha: मुंबईतील बीकेसीच्या मैदानात, महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत सर्वच प्रमुख नेत्यांनी एकीचा सूर आळवला. नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनीही महाविकास आघाडीत एक ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. तर शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्यानंतर सोनिया गांधींनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं. त्याचसोबत महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


2nd May In History : वर्षातील प्रत्येक दिवसाप्रमाणेच इतिहासातील अनेक चांगल्या-वाईट घटनांचीही नोंद 2 मे या दिवशी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्म 2 मे रोजी झाला. तर महान चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी या दिवशीच या जगाचा निरोप घेतला. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी


1519 : इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंची यांचे निधन (Leonardo da Vinci) 


युरोपच्या 15 व्या शतकातील प्रबोधनकाळातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे लिओनार्डो दा विंची. प्रसिद्ध चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ अशी ओळख असलेल्या लिओनार्डो दा विंची यांचं निधन आजच्या दिवशी म्हणजे 2 मे 1519 रोजी फ्रान्समध्ये झालं. लिओनार्डो दा विंची यांचे 'मोनालिसा' (Mona Lisa) हे ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध चित्र, त्याच्यातील गुढ रहस्यामुळे कायम स्मरणात राहतं. त्याचसोबत येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित 'द लास्ट सफर' हे चित्र तसेच 'मॅडोना ऑफ द रॉक्स' हे चित्र जगप्रसिद्ध आहे.


1920 : शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म


डॉ. वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. वसंतराव देशपांडे यांनी असद अली खाँ, सुरेशबाबू माने, अमानत अली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी आफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव देशपांडे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये वसंतरावांची भूमिका गायक राहुल देशपांडे यांनी केली होती. 


1921 : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक भारतरत्न सत्यजित रे यांचा जन्म (Satyajit Ray)


20 व्या शतकातील महान भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे (Satyajit Ray) यांचा जन्म 2 मे 1921 रोजी कोलकाता या ठिकाणी झाला. फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक जीन रेनुआ यांना भेटल्यानंतर आणि लंडनमध्ये इटालियन चित्रपट 'लाद्री डी बिसिक्लेटा' पाहिल्यानंतर त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली.


सत्यजित रे यांनी त्यांच्या कारकिर्दीत 37 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात फीचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील 'सर्वोत्कृष्ट मानवतावादी दस्तऐवज' पुरस्कारासह एकूण अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या पथर पांचाली या पहिल्या चित्रपटाला मिळाले. 'अपराजितो' आणि 'अपूर संसार'सह त्याच्या प्रसिद्ध अपू ट्रायलॉजीमध्ये हा चित्रपट समाविष्ट आहे.


सत्यजित रे यांनी स्वत: चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक कामे हाताळली. त्यामध्ये पटकथा लिहिणे, कलाकार कास्ट करणे, पार्श्वसंगीत तयार करणे, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन, संपादन आणि प्रचारात्मक साहित्य तयार करणे याचा समावेश आहे. चित्रपट बनवण्यासोबतच ते कथा लेखक, प्रकाशक, चित्रकार आणि चित्रपट समीक्षकही होते. राय यांना जीवनात अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात अकादमी मानद पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविविभूषण आणि भारतरत्न यांचा समावेश आहे.


1949 : महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू 


महात्मा गांधीं यांच्या हत्येच्या खटल्यावर सुनावणी 30 एप्रिल 1949 पासून पंजाब उच्च न्यायालयात सुरु झाली. ही सुनावणी 60 दिवस चालली आणि 21 जून रोजी यातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये नथूराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांना फाशीची शिक्षा झाली, तर इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती.


1950 : फ्रान्सची वसाहत असलेले चंद्रनगर भारताकडे सोपवण्यात आलं


फ्रान्सची वसाहत असलेले चंद्रनगर (Chandernagore) 2 मे 1950 रोजी भारताच्या ताब्यात देण्यात आलं. चंदननगर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यातील एक शहर आहे. हे चंद्रनगर म्हणून ओळखले जात असे आणि फ्रान्सची वसाहत होती. ती 1950 मध्ये भारतात विलीन झाली. हे कोलकात्याच्या उत्तरेस 30 किमी अंतरावर आहे.चंद्रनगर सध्या कोलकाता महानगर प्रदेशाचा भाग आहे आणि कोलकाता मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी अंतर्गत येतो.


2003: भारताचा पाकिस्तानशी पुन्हा संवाद सुरू


भारताने पाकिस्तानशी राजकीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची घोषणा 2 मे 2003 रोजी केली. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे संबंध तोडले गेले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.