Maharashtra Live Updates : भिवंडी: वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने केली अटक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Apr 2023 10:50 PM
Kalyan News: कल्याण गोदरेज हिल बस सोसायटीत कोसळली, बस चालक गंभीर जखमी
Kalyan News:  कल्याण गोदरेज हिल परिसरामध्ये बसचालकाचा ताबा सुटल्यामुळे बस मलबेरी मिडॉस या सोसायटीमध्ये कठाडे तोडून 25 ते 30 फूट उंचीवरून बस या सोसायटीमध्ये कोसळली. सुदैवाने सोसायटीच्या आवारामध्ये कोणी जखमी नसून तीन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. या घटनेत बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
Bhiwandi Crime News: भिवंडी: वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने केली अटक

Bhiwandi Crime News:  शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या  घटनांमध्ये वाढ होत असताना भिवंडी शहरातील गुन्हे शाखा युनिट दोन कडून दोन अटल चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन चोर वंजारपटी नाका येथे येणार असल्याची  माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून श्रीकांत बाळू बागरवार, निशांत मंगेश हूकमाळी यांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असत चोरी केलेली मोटरसायकल व सहा रिक्षा हस्तगत करण्यात आली. 

उध्दव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार..

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठडवड्यात बारसूला भेट देणार असल्याची माहिती विनायक राऊतांनी दिली आहे. 

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू

Chandrapur News:  चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. सावली तालुक्यातील वाघोली बुटी शेतशिवारातील ही घटना असून ममता बोदलकर असं 65 वर्षीय महिलेचं नाव आहे. शेतात काम करत असताना वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास याच भागात बस्तान मांडले. ही घटना पाहण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणी गेलेल्या नागरिकांवर देखील वाघाने चाल केली. 

Thane Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेचा बुलडोझर, तब्बल 24 अनधिकृत गाळे केले जमीनदोस्त

Thane Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं होतं. उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारावरील साईबाबा मंदिराच्या बाजूलाच दुमजली अनधिकृत गाळे उभारण्यात आले होते. तर इंदिरा गांधी मार्केट परिसरातही दुमजली गाळ्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. याबाबत तक्रारी आल्यानंतर आज महापालिकेने या दोन्ही ठिकाणचे मिळून तब्बल 24 गाळे जमीनदोस्त केले. शहरात अजूनही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं केली जात असून त्यातून मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांकडे महापालिकेने स्वतःहून लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. 

Latur News: लोकभावना लक्षात घेऊन निर्णय होईल, राष्ट्रीय महामार्गत येणारा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलवणार नाही; नितीन गडकरी यांचे आश्वासन

Latur News: रत्नागिरी कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जात आहे... या रस्त्यावर असलेला महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हलवण्या संदर्भातली चर्चा जोर धरत होती.. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लातूर येथे सर्व स्तरातून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता मात्र, हा पुतळा हलवणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूरमधील शिष्टमंडळाला दिले. 

Latur News: लोकभावना लक्षात घेऊन निर्णय होईल, राष्ट्रीय महामार्गत येणारा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलवणार नाही; नितीन गडकरी यांचे आश्वासन

Latur News: रत्नागिरी कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जात आहे... या रस्त्यावर असलेला महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हलवण्या संदर्भातली चर्चा जोर धरत होती.. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लातूर येथे सर्व स्तरातून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता मात्र, हा पुतळा हलवणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूरमधील शिष्टमंडळाला दिले. 

Mumbai News: अंधेरी-घाटकोपर दरम्यान धावणारी मेट्रो रेल्वे वाहतूक तांत्रिक बिघाडाने विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Mumbai News: अंधेरी-घाटकोपर दरम्यान धावणारी मेट्रो रेल्वे वाहतूक तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झाली आहे. मेट्रो रेल्वे ठप्प झाल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. 

Sharad Pawar: बारसू प्रकरणावर पवारांची मध्यस्थी? शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा

Sharad Pawar: शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. बारसूच्या विषयावर झाली दोघांमध्ये चर्चा झाली. बारसू रिफायनरीवर शरद पवार मार्ग काढणार का असा सवाल उपस्थित होत आहे

Nagpur News: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना बाररूच्या आंदोलनस्थळी जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

Nagpur News: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना बाररूच्या आंदोलनस्थळी जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे.. कलम 144 लागू असल्यानं तुम्ही जाऊ शकत नाही, असं पोलिसांनी विनायक राऊतांना सांगितलं. राऊतांना रानतळे चेकपोस्टवर अडवण्यात आलं.

Rajan Salvi: रिफायनरीची बाजू प्रशासनानं समजावून सांगावी, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं ट्विट

 Rajan Salvi: बारसू रिफायनरीबद्दल राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी महत्त्वाचं ट्वीट केलंय. कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच आहे..  विरोध करणाऱ्या माझ्या नागरिकांना प्रशासनाने प्रकल्पाची बाजू पटवून द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, असं साळवी यांनी म्हटलंय 

अजित नवले यांना सीआरपीसी 149 ची नोटीस, अजित नवले आंदोलनावर ठाम

Ajit Nawale : अजित नवले यांना सीआरपीसी १४९ ( प्रतिबंधात्मक ) ची नोटीस... 
उष्माघाताचे कारण देत अकोले पोलिसांनी बजावली नोटीस...
अजित नवले आंदोलनावर ठाम...
पोलीस सुद्धा शेतकऱ्यांची मुलं...
आम्ही उन्हात चालल्याची सरकारला खूप काळजी...
उन्हात राबणारा शेतकरी सरकारला दिसत नाही का? अजित नवलेंचा सवाल...
सरकारचा बुरखा फारडायला निघाल्यानं उन्हाचे कारण देत लगेच नोटीस बजावली.
आम्ही काळजी घेऊन मोर्चा काढणारच...


 


 

Kharghar Tragedy : खारघर दुर्घटने प्रकरणी दाखल जनहित याचिकेवर सुनावणीवर पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता

Kharghar Tragedy : खारघर दुर्घटने प्रकरणी दाखल जनहित याचिकेवर सुनावणीवर पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता


मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप करत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी


14 जणांच्या मृत्यूला जबाबदार धरत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींवरही फौजदारी कारवाईची मागणी


राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम केल्याचा याचिकेत आरोप


विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुतेंमार्फत दाखल केलीय याचिका

Nashik News: नाशिकमध्ये बी.एडच्या सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकावरून मोठा गोंधळ

Nashik News: नाशिकमध्ये बी.एडच्या सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकावरून मोठा गोंधळ उडाला आहे. हॉल तिकीटवर आजची तारीख असल्याने परीक्षार्थी परीक्षेसाठी आले. मात्र ही परीक्षा 25 तारखेला म्हणजे कालच झाल्याचं त्यांना परीक्षा केंद्रावर सांगण्यात आलं. अखेर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी हस्तक्षेप केला.. त्यानंतर परीक्षार्थींना ईतर दोन महाविद्यालयांमध्ये हलवण्यात आलं, आणि सकाळी 11 वाजता ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

MVA Sabha: महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत कॉंग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पाच सदस्यांची समिती गठीत

MVA Sabha: महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत कॉंग्रेसही मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.. यासाठी काँग्रेसच्या पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.. या समितीत माजी मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांचा समावेश आहे. 

महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत काँग्रेसही मोठं शक्तिप्रदर्शन करणार, यासाठी काँग्रेसच्या पाच सदस्यांची समिती गठित

Maha Vikas Aghadi Rally in Mumbai : महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत काँग्रेसही मोठं शक्तिप्रदर्शन करणार


यासाठी काँग्रेसच्या पाच सदस्यांची समिती गठित


माजी मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांची समिती स्थापन


या सभेसाठी जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करण्याची आणि संपूर्ण नियोजन करण्याची या समितीवर जबाबदारी


या सभेचं नियोजन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असलं तरी आगामी मुंबई महानगरपालिका लक्षात घेता काँग्रेसही मोठ शक्तिप्रदर्शन करणार

Uday Samant: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द

Uday Samant: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द झाली आहे. उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट रद्द झाल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. बारसू रिफायनरी प्रकरणी भेटीला विशेष महत्त्व आहे. 

दौंडमधील वरवंड इथे संजय राऊत यांची आज जाहीर सभा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

Sanjay Raut Rally : खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दौंडचे भाजपचे आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या सभेत खासदार राऊत यासंबंधी आणखी काय बोलणार याकडे संपूर्ण दौंड तालुक्यातील लक्ष लागले गेले आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता ही सभा वरवंड येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या आवारात ही सभा होणार आहे. या सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

 Vasai News: वसईच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

 Vasai News: वसईच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागून ट्रक पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घटनास्थळी ड्रायव्हर नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  या घटनेनंतर स्वच्छता विभाग आणि महापालिकेच्या ठेकेदारावर गंभीर आरोप होत आहेत. वसईत ठेकेदार जुन्या वाहनांमधून कचरा उचलतात, असा आरोप नागरिक करतात.  

 Mumbai News: मुंबईत मोबाईल चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस जेरबंद

 Mumbai News: मुंबईमधील बसस्टॉपवरील आणि बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस जेरबंद करण्यात आले आहे  

Satara Accident: वाईच्या पसरणी घाटाच्या  दरीत टँकर कोसळला

Satara Accident: वाईच्या पसरणी घाटाच्या  दरीत टँकर कोसळला आहे वाहनामध्ये दोनजण असल्याचा अंदाज आहे बचावकार्याचे प्रयत्न सुरु आहेत.  

Pune News: पुणे जिल्ह्यातील वरवंड येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा

Pune News: आज पुणे जिल्ह्यातील वरवंड येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा. दौंडमधील भीमा पाटस कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी कुल यांच्यावर राऊतांनी घणाघात केला होता. त्याचप्रकरणी राऊत यांची  आज जाहीर सभा

Uday Samant:  बारसूमधील रिफायनरीवर चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आज शरद पवारांना भेटणार

Uday Samant:  बारसूमधील रिफायनरीवर चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आज शरद पवारांना भेटणार आहेत.. सकाळी 10 च्या सुमाराला मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर इथं ही भेट होणार आहे. भेटीनंतर शरद पवार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

 Mumbai Police: आरोग्याची समस्या असलेले 55 वर्षांवरील मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी

 Mumbai Police: मुंबई पोलिसांनी रस्त्यावर वाहतूक व्यवस्थापित करणाऱ्या पोलीस हवालदार आणि अधिकाऱ्यांसाठी खबरदारी घेतलीये... वाहतुक विभागातील ज्या अंमलदारांचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त आहे... ज्यांना बी.पी., शुगर, दमा, दुर्धर आजार आणि मोठे ऑपरेशन झाले आहे... अशा अंमलदारांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्त्यावरील कर्तव्याकरीता नेमणूक करण्यात येवू नये असे आदेश जारी करण्यात आलेत.. 

Kisan Sabha: शेतकऱ्यांसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा लाल वादळ रस्त्यावर

Kisan Sabha: शेतकऱ्यांसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा लाल वादळ रस्त्यावर उतरणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी असा 55 किलोमीटर अंतर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर काल मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज दुपारी या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे... तीन दिवस चालणाऱ्या या

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रत्नागिरीत रिफायनरी विरोधी आंदोलन पेटलं होतं. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे महसूल मंत्री विखे-पाटील यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरल्याने अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अकोले ते लोणी असा मोर्चा काढण्यात येणार आहे. 


बारसू सोलगावमध्ये आंदोलन सुरू असून खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत. - बारसू सोलगावमध्ये आंदोलन सुरू असून खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत. मंगळवारी ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध केला होता. पोलिसांसोबत झटापट झाल्याचे वृत्त होते. रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. 


मुंबई 
- उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत. बारसू प्रकरणावर चर्चा होणार आहे. 
- खारघर मधील विवादीत महाराष्ट्र भूषण सोहळा घटनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर आज तातडीच्या सुनावणीची शक्यता.
- शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांनी जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
- अभिनेता नवाझऊद्दीन सिद्दिकीनं त्याच्या मुलांकरता बायकोविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 


दिल्ली 
- अन्नाद्रमुक महासचिव आणि तमिळनाडुचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी आज गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. 


- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौराष्ट्र तमिल संगममच्या समारोह कार्यक्रमाला संबोधित करतील.


- केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक होणार आहे. 



अहमदनगर
 


- अकोले: पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून आजपासून पुढचे तीन दिवस शेतकऱ्यांच्या वतीनं अकोले ते लोणी पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता अकोले शहरातून या मोर्चाला सुरूवात होणार आहे. 



- शिर्डी येथे राज्यपाल रमेश बैस साई मंदिराला भेट देणार असून शेजारती देखील करणार आहेत. 
 


पुणे 
- वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भाजपचे आमदार राहूल कुल यांच्या विरोधात संध्याकाळी 6 वाजता सभा


- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक. पुण्यात पाणीकपात होणार का हे या बैठकीत ठरणार आहे.



नाशिक
-  राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा आणि दर्शन घेणार आहेत. दुपारी, कालिदास नाट्यगृहात नाशिक एज्युकेशन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.