Maharashtra Live Updates : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर, अन्य प्रकरणांमुळे तुरुंगातच राहावे लागणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Apr 2023 11:15 PM
Nagpur News: नागपूर: तीन वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा जखमी

Nagpur News: नागपूरात तीन वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुलाच्या आईने  लगेच कुत्र्यांचा हल्ला पाहत तिथे धाव घेतल्यामुळे मुलगा बचावला आहे. या घटनेत डूग्गु दुबे नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनमोल नगरात आज दुपारी घडली. कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे..

Vasai News: दिल्ली, चेन्नई, ठाणे, वसई-विरार येथे 100 हून अधिक सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत इराणी चोराला वसई पोलिसांकडून अटक

Vasai News:  दिल्ली, चेन्नई, ठाणे, वसई-विरार येथे 100 हून अधिक सोनसाखळी चोरी करणारा सराईत इराणी चोराला वसईच्या क्राईम युनिटनं मोठ्या शिताफिने अटक केली आहे. कल्याणच्या आंबिवली येथून इराणी चोराला अटक करणं मोठं जिकरीचं काम असतं. चार वेळा ट्रॅप लावूनही गळाला न लागलेला हा सराईत चोर अखेर पोलिसांच्या हाती लागला. याच्यावर मकोका सारखे दोन गंभीर गुन्ह्यांस दुखापती जबरी चोरी सारखे 21 गुन्हे ठाण्यात नोंद आहेत. तर 7 गुन्हे वसई विरार हद्दीत आहेत.

Yes Bank Scam: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर, अन्य प्रकरणांमुळे तुरुंगातच राहावे लागणार

Yes Bank Scam:  येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर


एचडीआयएलला 900 कोटींचं अनियमित कर्ज दिल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन 


मात्र राणांविरोधात अन्य काही प्रकरण अद्याप प्रलंबित अससल्यानं तूर्तास मुक्काम जेलमध्येच राहणार

Weather Forecast: एप्रिलच्या महिन्यातच उन्हाच्या झळा; विदर्भातला पारा चढला, राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार

एप्रिलच्या महिन्यातच उन्हाच्या झळा; विदर्भातला पारा चढला, अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार 


उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील तापमान चाळीशी पार 


चंद्रपुरात 42.2अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरीत देखील पारा 42 वर 


अमरावतीत पारा 41.4 अंशांवर तर अकोल्यात 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 


यवतमाळ 41, वर्धा 41.1, नागपूर 39.4, गोंदिया 40.4 तर वाशिम जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 


जळगावात 41.7 अंश, सोलापूर 41.3 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 40.2, परभणीत 40.7 तर औरंगाबादेत 39.2 अंश सेल्सिअस


पुणे 38.8, कोल्हापूर 38.7, सातारा 39.3, सांगली 38.6 आणि अहमदनगरमध्ये 39.4 कमाल तापमानाची नोंद

Hasan Mushriff : हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला दिलं आव्हान

हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव


मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला दिलं आव्हान


उद्या 13 एप्रिलला होणार तातडीची सुनावणी


मुंबई सत्र न्यायालयानं ईडीच्या प्रकरणात मुश्रीफ यांना 14 एप्रिलपर्यंत दिलंय अटकेपासून संरक्षण

नवी मुंबईतील मनसेचे भीक मांगो आंदोलन, सिडकोने घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी

Navi Mumbai MNS Agitation : सिडकोच्या 2022 मध्ये दिवाळी गृहनिर्माण लॉटरी काढली होती. यामध्ये उलवेमधील खरकोपर बामन डोंगरीच्या घरांचा समावेश आहे. सिडकोने यात आर्थिक दुर्बल घटक (EWS) वर्गात जी घरे बांधली आहेत त्यांच्या किमती ग्राहकांच्या आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे या घराच्या किंमती कमी कराव्यात, यासाठी रहिवाशांबरोबर मनसेने आंदोलन सुरु केले आहे. यासाठी मनसेकडून सीवूडस येथे सिडकोच्या नावे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. सिडकोने पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधताना याच्या किंमती या 18 ते 20 लाखांपर्यंत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सिडकोने 35 लाखापर्यंत घरांच्या किंमती वाढवल्याने गोरगरिबांनी घरे घ्यायची कशी असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागपूरमधील महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

MVA Rally in Nagpur : नागपूरमधील महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली जनहित याचिका दाखल केली आहे. दर्शन कॉलनी मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णाचा विचार करता या सभेची परवानगी नाकारावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50 हजार ते एक लाखाची मदत द्या, अजित पवारांची मागणी

Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (unseasonal rains) राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं आडवी झाली आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार आहे. यावेळी अजित पवार विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

आभाळ फाटलं ठिगळं लावायचं कुठं? नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अश्रू अनावर

Nashik News : गेल्या चार दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट सुरु आहे. यामुळं जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी अशा 11 तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलं आहे. या भागातील जवळ-जवळ 145 गावं आणि 8468 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले आहेत. आभाळचं फाटलं तिथं ठिगळं कुठं लावायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

Nana Patole Delhi Visit : एक आठवड्याच्या आत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर


महाविकास आघाडीत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवरुन तयार झालेल्या संभ्रमानंतर नाना नाना पटोले यांच्या दिल्लीच्या दौऱ्याला महत्व


सावरकर आणि अदाणी यांच्यावरुन सध्या महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर


त्यातच राज्यात काँग्रेसची होते असलेली कोंडी पक्षश्रेठींच्या कानावर टाकायला नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर

महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण... बीड शहरातील घटना..

Beed News : महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण... बीड शहरातील घटना..


भाजपनेते नवनाथ शिराळेंसह इतरांविरूध्द गुन्हा दाखल..


बँक मॅनेजर उद्धट वागत असल्याने चोप दिल्याचा भाजप कार्यकर्त्याचा दावा..


बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरामध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बीड शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साठे चौक येथील डेप्युटी मॅनेजर रामप्रसाद येवले यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजपचे नेते नवनाथ शिराळेंसह इतरांविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उद्धट वागणूक असल्याने व ग्राहकांना सतत त्रास देत असल्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे.

चंद्रपुरातील कोरपना शहरात दुचाकीच्या शोरुमला भीषण आग; 40 दुचाकी, यंत्रसामुग्री, सुट्ट्या भागांसह, संगणक आणि इतर कागदपत्रे जळून खाक

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना शहरात दुचाकी शोरुमला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत शोरुममधील 40 दुचाकी, यंत्रसामुग्री, सुट्ट्या भागांसह, संगणक आणि इतर कागदपत्रे जळून राख झाले. रात्री उशिरापर्यंत विविध अग्निशमन बंबांनी प्रयत्न केल्यावर आग विझली.

मुंबईतील चेंबूर परिसरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

Mumbai News : मुंबईच्या चेंबूर परिसरात 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. परीक्षेच्या वेळी शिक्षकांनी तिला कॉपी करताना रंगेहाथ पकडलं होतं. ही बाब शिक्षकांनी मुलीच्या पालकांना सांगितली. यामुळे विद्यार्थिनी निराश झाली होती. त्यातच तिने आपल्या घरातील सीलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी चेंबूर पोलीसने आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यात पारा 39 अंश सेल्सिअस पार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा देखील तापला 

Maharashtra Temperature : विदर्भातील अनेक जिल्ह्यात पारा 39 अंश सेल्सिअस पार 


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा देखील तापला 


जळगाव, परभणी आणि सोलापुरात पारा चाळीशी पार 


आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज 


उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर, काही ठिकाणी गिरपिटीची देखील शक्यता

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, पुढील आठवड्यात मुंबईत भेट होण्याची शक्यता

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल उद्धव ठाकरे यांची भेट घेणार 


महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राखण्यासाठी राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे यांना भेटणार


पुढील आठवड्यात मुंबईत भेट होण्याची शक्यता


महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय सुधारण्याच्या उद्देशाने काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सिल्वर ओकवर भेट

Agriculture News : क्लस्टर शेतीसाठी पाच खाजगी कंपन्यांना केंद्र सरकारची परवानगी

Agriculture News : क्लस्टर शेतीसाठी पाच खाजगी कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सरकारी अनुदानासह 750 कोटीची गुंतवणूक क्लस्टर. फळ शेतीसाठी निवडलेल्या पाच कंपन्यांमध्ये देसाई अॅग्री फोर्स, एफआयएल इंडस्ट्रीज, सह्याद्री फार्म्स, मेघालय बेसिन मॅनेजमेंट एजन्सी आणि प्रसाद सीड्स यांचा समावेश आहे. भारतीय उत्पादनाला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रात विशेष फलोत्पादन पिकाच्या क्लस्टर लागवडीसाठी पाच खासगी कंपन्यांना परवानगी दिली आहे.

जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले, नांदेडच्या किनवट तालुक्यात हरणांची पाण्यासाठी भटकंती

Nanded News : नांदेडमध्ये उन्हाळ्याच्या झळा जाणवायला आता सुरुवात झाली असून जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटून गेले आहेत. त्यामुळे हरणांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होताना दिसून येते आहे. किनवट तालुक्यात हरणांचे कळप पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत, त्यातून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन जंगलात कृत्रिम पाणवठे उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी प्राणीप्रेमी तसंच नागरिकांनी केली आहे.

नागपूरमधील सभेसाठी मैदानाच्या निवडीवरुन महाविकास आघाडीचे नियोजन फसले?

Nagpur Maha Vikas Aghadi Rally : 16 एप्रिलला नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी सभा होत आहे. एकीकडे आयोजकांची सभेला घेऊन तयारी सुरु असताना दुसरीकडे स्थानिकांचा सभेला विरोध सुरु आहे. यातच आता व्यासपीठ आणि सुरक्षा सर्कल डी सोडले तर उर्वरित जागेत फक्त 12 हजार खुर्च्या मावतील इतकीच जागा शिल्लक राहत आहे. त्यामुळे एक लाखाची सभा घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकताना दिसत आहे. त्यामुळे मैदानाच्या निवडीवरुन महाविकास आघाडीचे सभेचे नियोजन फसले का अशी चर्चा रंगली आहे?

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वनवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ
Nandurbar:  गेल्या तीन-चार दिवसापासून नवापूर तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये वनवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असते.  वनविभागाकडे आग विझवण्यासाठी ठोस अशी यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.वनवा पेटल्याने मौल्यवान वृक्ष, वनौषधी वन्य प्राण्यांची हानी तसेच नवनवीन वनस्पती नष्ट झाल्याचे चित्र नवापूर तालुक्यातील पानबारा गावानजीक असलेल्या जंगलातील दृश्य दिसून येत आहे .याबाबत वन विभागाने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. नेमके जंगलात आग लागली कशी खरंच वनवा पेटला की पेटवला गेला हा देखील संशोधनाचा विषय आहे यावर वन विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी वन प्रेमींनी केली आहे.
Mumbai Police Bharti:  मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय

Mumbai Police Bharti:  राज्यातील विविध जिल्हा आणि ग्रामीण भागातून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी प्रशासनानं कोणतीही सोय केलेली नव्हती. त्यामुळं शेकडोंच्या संख्येनं आलेल्या तरुणांना मुंबईतल्या कलिना परिसरात रस्त्यावरच झोपावं लागलं. मनसे नेते अखिल चित्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या परिस्थितीचा मध्यरात्री आढावा घेतला. त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी पाण्याची बाटली आणि मच्छरनाशक फवारणीची व्यवस्था केली. पोलीस भरतीसाठी राज्यभरातून येणाऱ्या उमेदवारांसाठी प्राथमिक सोयसुविधा करून देता येत नसतील तर सरकार या तरुणांना परीक्षेसाठी का बोलावतं, असा प्रश्न मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी विचारला आहे.

Vasai Viral Video:  जीव धोक्यात घालून बसच्या मागे लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल

Vasai Viral Video:  जीव धोक्यात घालून बसच्या मागे लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. रात्री 11  च्या सुमारास वसई ते बाफाणे या मार्गावर वसई-विरार पालिकेच्या बसच्या मागे लटकून एक जण प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय.. रात्रीच्यावेळी बस कमी असल्याने प्रवासी असा लटकून प्रवास करतायत.. त्यामुळे बस फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. 


 





Nandurbar Accident:  नंदुरबारच्या शहादा जवळ सुरत-खरगोन बसचा अपघात, 15 प्रवासी जखमी

Nandurbar Accident:  गुजरात राज्यातील सुरत येथून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत खरगोन बसचा शहादा शहरातील 132 केवी सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन 15 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने आणि प्रवाशांनी मदतीची याचना करण्यासाठी गोंगाट केल्याने स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांचे रेस्क्यू करण्यात आले या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी ही पुढे येत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.


नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..


नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी -


नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी 4:30 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. 


किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत.



मुंबई – किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. मागील दोन महिने बघता महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडच्या वर बघायला मिळाला आहे. आरबीआयकडून पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील महागाईचे आकडे वर गेल्यास पुन्हा एकदा व्याजदरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा किरकोळ महागाई दर किती राहतो हे बघणं महत्त्वाचे असणार आहे.  


पुणे – पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा


पिंपरी – सुप्रिया सुळे भोर वेल्हा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.


रत्नागिरी – सावरकर गौरव यात्रेत मंत्री उदय सामंत सहभागी होणार आहेत. 


विधान परिषद विरोधी पक्षनेते आबांदास दानवे आज निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चांदोरी, टाकळी, विंचूर भागात कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. 


चंद्रपूर – 4 दिवसीय बहुजन समता पर्वात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सहभागी होणार आहेत. 
 
मुंबई – कर्नाटकच्या निवडणुका लागल्यात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. 


 मुंबई – वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस भारतीय प्रवाशांना मिळणार आहे. सध्या धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस या चेअर कार म्हणजेच बसून प्रवास करणाऱ्या डब्यांच्या होत्या. मात्र भारतीय रेल्वे दिलेल्या नवीन एका ऑर्डर नुसार झोपून प्रवास करता येतील अशा स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार आहेत. तब्बल 80 स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेसची ऑर्डर देण्यात आली आहे.  


  नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी 4:30 वाजता सुनावणी सुरु होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.