Maharashtra News LIVE Updates : बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रूपांतर; महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 May 2023 10:07 PM
Nanded News: नांदेड: भोकर-नांदेड महामार्गावर ट्रकने बुलेटला चिरडले, दोघांचा मृत्यू

Nanded News:  नांदेड ते भोकर महामार्गावरील खैरगांव पाटीजवळ एका मालवाहू ट्रकने समोरून येणाऱ्या बुलेटला जोराची धडक देऊन चिरडले. या अपघातात बुलेट वरील दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. ही घटना दि. ११ मे रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास अर्धापूर तालुक्यातील खैरगांव-आमराबाद पाटीजवळ घडली. 

Parbhani News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परभणीत शस्त्रबंदीसह जमावबंदी; 15 मे पर्यंत आदेश लागू

Parbhani News: आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी परभणीत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये 15 मे च्या मध्यरात्री पर्यंत परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहे. या दरम्यान जिल्ह्यात शस्त्रे,सोटे,तलवारी,भाले,दंडे, बंदुका,सुरे,काठ्या,लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल,अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही.तसेच व्यक्तीचे प्रेते,आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. 

Cyclone Mocha:  पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रूपांतर; महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही

 पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले 


या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही 


अवकाळी पावसाची शक्यता नाही 


कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता

Hingoli News: हिंगोली: 40 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात, अनुकंपाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी मागितली लाच

Hingoli News:  हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पूर्ण कारखाना वसाहत परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकाने अनुकंपाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी चक्क 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत विभागाला दिल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. 

गुजरातकडून मुंबईकडे अवैधरीत्या खैर या महागड्या लाकडाची वाहतूक, पोलिसांची कारवाई

Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातकडून मुंबईकडे अवैधरीत्या जंगल तोड करुन खैर या महागड्या लाकडाची वाहतूक  करणाऱ्या ट्रकसह एका आरोपीला कासा वनविभागाने ताब्यात घेतल आहे. या कारवाईत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल वन विभागाने सापळा रचून ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका वर्षानंतर आम्ही सत्तेत असणारं, अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
Amit Thackeray :  एका वर्षानंतर नक्कीच आम्ही सत्तेत असणारं अहोत. आता सत्तेत जायचं की नाही हे राज ठाकरे ठरवतील असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं. सध्या राज्याला स्थिर सरकारची गरज आहे.अत्ता माझ्या दृष्टीने राजकिय प्रश्न नाही तर लोकांचे प्रश्न महत्वाचे असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग परिसरात जोरदार अवकाळी पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज  वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ, संजय राऊतांचं ट्वीट


Sanjay Raut : महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय आज लागणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज  वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.

 

 


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडीची नोटीस, सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

प्रवीण दरेकर घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

भाजप आमदार प्रवीण दरेकर हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता प्रवीण दरेकर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. येत्या 14 मे रोजी गोरेगाव नेस्को येथे गृहनिर्माण सोसायट्यांची सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने प्रवीण दरेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.


 

नागपूर-नांदेड महामार्गावर खुराणा ट्रॅव्हल्सला आग

Washim : नागपूर-नांदेड महामार्गावर खुराणा ट्रॅव्हल्सला आग  लागल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये जिवीतहानी झाली नाही. यामध्ये एकूण 30 प्रवासी होते, त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. वाशीमच्या जाग माथा परिसरात आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ही बस नागपूरवरुन नांदेडकडे जात होती. दरम्यान आग लागल्याचा प्रकार एका प्रवाशाच्या लक्षात येताच चालकाला तत्काळ माहिती देताच सर्व प्रवासी खाली उतरताच वाहनाने पेट घेतला. यामध्ये संपूर्ण गाडी जळून राख झाली आहे. मात्र, या घटनेत कुणी जखमी झाले नाही. मात्र प्रवाशाच्या साहित्याचा कोळसा झाला आहे. ही आग वाहनाच्या शॉर्ट सर्किटमुळ झाल्याचे सांगितले आहे. वाहनात अग्निशमन यंत्र नसल्यानं आग विझवता न आल्याची माहिती समोर आली आहे. 

आज शिंदे गटाचा फुगा फुटेल, निकाल आमच्याच बाजूनेच लागेल : चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire : आज शिंदे गटाचा फुगा फुटेल. निकाल आमच्याच बाजूने लागेल अशी प्रार्थना करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. न्यायालयाला पण प्रार्थना करू शकत नाही, त्यामुळं काल देवाला पूजा करून प्रार्थना केली आहे की निकाल आमच्या बाजूने लागू दे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज निकाल 


Maharashtra Political Crisis Chronology:  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics)  बदलवणारा हा निकाल असणार आहे. 


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी काल (10 मे) एका प्रकरणाची सुनावणी करत असतानाच  11 मे रोजी दोन महत्वाच्या प्रकरणांवर घटनापीठ निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळं सर्वच जणांचे लक्ष आजच्या या निकालाकडे लागलं आहे. देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात किचकट प्रकरण असलेल्या निकालाचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या पद्धतीने विश्लेषण करणार? याकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. 


मागील वर्षी  जून महिन्यात झालेली विधानपरिषदेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. संख्याबळ कमी असतानाही भाजपनं हे कसं साधलं याची चर्चा सुरु असतानाच अचानक वेगळ्या नाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही आमदार हे सुरतच्या दिशेनं निघाल्याची बातमी आली आणि तिथूनच सुरु झाला महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा सत्तासंघर्ष. हा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टातही कित्येक महिने गाजत राहिला.


शिवसेनेतल्या अंतर्गत कलहानंतर बैठकांचं सत्र सुरु झालं. दोन्ही गटांनी आपापले गटनेते, व्हिप जाहीर केले. बैठकीला आला नाहीत तर अपात्रतेची कारवाई होईल असे इशारेही दिले गेले. एकीकडे ठाकरे गटाकडून ही हालचाल तर दुसरीकडे शिंदे गटानं तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वासाची नोटीस आणली. तिथूनच या कायदेशीर पेचाला सुरुवात झाली. 


प्रवीण दरेकर घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट


भाजप आमदार प्रवीण दरेकर हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. 
आज सकाळी नऊ वाजता प्रवीण दरेकर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. येत्या 14 मे रोजी गोरेगाव नेस्को येथे गृहनिर्माण सोसायट्यांची सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने प्रवीण दरेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.