Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Apr 2024 01:21 PM
राज ठाकरे यांच्यामध्ये हुबेहूब बाळासाहेब ठाकरे

हुबेहूब बाळासाहेब ठाकरे आम्ही राज ठाकरे यांच्यामध्ये पाहतो 

शिवसेना जी चालत होती ती आता मनसे काम करतेय ..

मदत करणारा माणूस म्हणून पहिला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं, आता राज ठाकरे यांचं घेतलं जात 

त्यांच्या निर्णयाचे राज्यात स्वागत गकेलं जातंय .

खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख यांचं विचार राज साहेब करत आहेत...

बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वसाठी काम करत होते आता राज ठाकरे करताहेत 

मी पत्नी आजारी होती तेव्हा हिंदुजामध्ये बेड मिळावा यासाठी राज साहेब आणि उद्धव साहेब दोघांना फोन केला.

 7व्या मिनिटाला मदतीसाठी राज ठाकरे यांचा कॉल आला मात्र 7तास झाले तरी उद्धव ठाकरे यांचा कॉल आला नाही

शिवसेनेत जे जे नावलौकिक होत होते, त्यांच्या विरुद्ध डाव रचले जात होते आणि बाजूला काढले जात होते...

पक्ष प्रमुख हे करत होते हे जास्त वाईट वाटत होतं 

संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीच्या वतीने रिक्षा रॅली

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीच्या वतीने रिक्षा रॅली काढण्यात आली... कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली... महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोठीतीर्थ तिथल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला... यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..कोल्हापूर शहरातील मुख्यमार्गांवर ही रॅली काढण्यात आली... यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला...

शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये पहिल्यांदाच बैठकीसाठी मुस्लिम महिला

ज्या छत्रपती संभाजी नगर मध्ये आतापर्यंत  निवडणुकांमध्ये 'खान या बाण' ची लढाई पाहायला मिळायची  

त्या छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये काहीसा वेगळं चित्र पाहायला मिळतय 

शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये पहिल्यांदाच मुस्लिम महिला प्रचाराच्या बैठकीसाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत  

 एकीकडे विद्यमान एम आय एम चे   खासदार  असताना दुसरीकडे मुस्लिम मतदारांना  छत्रपती संभाजी नगर मध्ये आपल्या बाजूने आणण्यासाठी  सर्वच उमेदवाराकडून प्रयत्न केले जात आहेत  

कारण या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांच्या  मतदानावर कोणता उमेदवार निवडून येईल हे चित्र स्पष्ट होणार 

 शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात आलेल्या मुस्लिम महिलांची बातचीत केलीये

पुण्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन

पुण्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन

खडकवासला विधानसभा मतदार संघात उभरण्यात येणार सुनेत्रा पवार यांच निवडणूक प्रचार कार्यालय

अजित पवार यांच्या हस्ते होणार सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाच उद्घाटन

भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील लावणार उद्घाटन  कार्यक्रमला राहणार उपस्थित

नवले पूल परिसरात असणार नव कार्यालय

शिवसेना उध्दव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, मशाल गीतात "भवानी" शब्द आल्यानं नोटीस 

शिवसेना उध्दव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, 

मशाल गीतात "भवानी" शब्द आल्याने पाठवली नोटीस 

याच संदर्भात आज उध्दव ठाकरे घेणार पत्रकार परिषद 

पत्रकार परिषदेत विरोधकांची अनेक उदाहरणे देऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची शक्यता

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर, 400 सोसायटीच्या संचालकंसोबत बैठक

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर

अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघातील राहिवाशी सोसायटीच्या संचालकांची आणि सदस्यांची बोलावली बैठक

खडकवासला मतदार संघातील जवळपास 400 सोसायटीच्या संचालकंसोबत अजित पवार यांची बैठक

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खडकवासला भागात आज अजित पवार घेणार अनेक बैठका

400 रहिवाशी सोसायट्यांमधील सेक्रेटरी आणि पदाधिकाऱ्यासोबत अजित पवारांच्या बैठकीला सुरुवात

16 हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता कवडीमोल भावानं विकत घेतल्या, डी एस कुलकर्णींचे गंभीर आरोप  

बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी गंभीर आरोप केला आहे. डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांन कवडीमोल भावानं विकत घेतली. मात्र ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत, असा डीएसकेंचा दावा आहे. 16 हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटींना विकत घेतल्याचं डीएसके यांनी सांगितलं. व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका यांनी NCLT मार्फत डीएसके यांच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. त्याविरोधात डीएसके सुप्रीम कोर्टात गेलेत. सुप्रीम कोर्टानं 10 मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थगिती दिली आहे. माझ्या सर्व मालमत्ता जप्त असल्यानं मला त्या विकता येत नाहीत. देशभरातली माझी खाती गोठवली आहेत. अशा परिस्थितीत मी पैसे कसे परत करायचे? असा सवाल डीएसके यांनी विचारला. 

धाराशिव जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा,उमरगा आणि धाराशिव तालुक्यात अवकाळी पावसानेधुमाकूळ घातलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात पावसाचे पाणीच पाणी, सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसा बसल्याने नळदुर्ग, अणदूर परिसरातील झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर उमरगा तालुक्यातील सात शेळ्या आणि इतर तीन जनावरांचा वीज कोसळून मृत्यु झाला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.