Maharashtra Budget Session : मुंबईतील अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाई कधी करणार असा प्रश्न भाजपचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत केला. शासकीय जमिनींवरील अनधिकृत प्रार्थनास्थळांबाबत संजय उपाध्याय यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. येत्या 30 मार्च रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात गोमांस येऊ शकते असा दावाही त्यांनी केला आहे. 


भाजप आमदार संजय उपाध्याय म्हणाले की, "24 तारखेला नागपाड पोलिसांच्या हद्दीत एका दुकानातून गोमांस ट्रकमध्ये टाकण्यात आलं. त्यावर तक्रार करण्यात आली पण हद्द कुणाची आहे हे ठरवण्यासाठी तीन तास गेले, पण कारवाई झाली नाही.  आता येत्या 30 मार्च रोजी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस येऊ शकते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना द्याव्यात." 


मानखुर्दमध्ये दुसऱ्या मजल्यावर मजार, आमदाराचा दावा


संजय उपाध्याय म्हणाले की, "एमएमआर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर अनाधिकृत पद्धतीने कब्जा केला जातोय. घाटकोपर मानखुर्द मध्ये 200 फुटावर मजार बांधण्यात आली आहे. तिथे आता दुकाने वगैरे आहेत. जमिनीवर मजार असते पण इथे पहिल्या माळ्यावर आहे. पोलिसान सांगूनही त्यावर कारवाई होत नाही."


संजय उपाध्याय पुढे म्हणाले की, "राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा उपनगरमध्ये अनेक ठिकाणी कारवाई करून मैदान केले. पण त्यानंतर हे मंत्र्याच्या विरोधात याचिका करत आहेत. यांच्याकडे पैसा कुठून येतोय? सरकारी जमिनीवर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. यावर सरकारी अधिकारी कारवाई करत नाही. त्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार?"


अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार


दरम्यान आमदार संजय उपाध्याय यांनी उपस्थित केलेल्या अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या प्रश्नावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. ही अनधिकृत बांधकामं जर कोणाच्या आशीर्वादाने झाली असतील तर त्याची चौकशी करणार असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं. 


ही बातमी वाचा: