Jalna Ram Mandir Theft : जालना जिल्ह्यातील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांनी अखेर दोन महिन्यांनी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मूर्ती देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पण या चोरीचा छडा फक्त पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या तंबाखू आणि चपलेतून झाला आहे. 'जांब समर्थ' येथील येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरच उलगडा करण्यात पोलिसांना तंबाखू आणि चपल दोन महत्वाचे पुरावे ठरले. 


'किक बसली तंबाखूची,चोरट्यांना लागला चुना..पायतान विसरले देवळात, उघडकीस आला गुन्हा,' या चार वळी जरी कवितेच्या वाटत असल्या तरीही जालना येथील 'जांब समर्थ' येथील येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरीचा छडा कसा लागला याचं रहस्य उलगडणाऱ्या आहेत. कारण तंबाखू आणि पायताण या दोन गोष्टीमुळेच या चोरीचा संपूर्ण छडा लागण्याची शक्यता आहे. तंबाखू मळत देवाच्या गाभाऱ्यात लुटणाऱ्या या चोरट्यांनी तिथेच पिचकारी मारली आणि हाच पोलिसांसाठी पुरावा ठरला. 


विसरलेलं पायतान घडवणार जेलवारी...


ज्याप्रमाणे पोलिसांसाठी तंबाखू पुरावा म्हणून हाती लागला त्याचप्रमाणे चोरट्यांनी घटनास्थळी सोडून गेलेला पायातण देखील महत्वाचा पुरावा बनला. आता चोराचे पायाचे ठसे आणि पायतानाची साईज याचा अभ्यास करून पोलीस उर्वरित आरोपीचा शोध घेणार आहे. विसरलेला पायतान या चोरट्याला जेलवारी घडवण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे चोरटे कितीही हुशार असले तरीही पोलीस त्यांच्यापेक्षा अधिक स्मार्ट आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 


आतापर्यंत नेमकं काय घडलं...



  • 22 ऑगस्टला समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरीची घटना समोर आली.

  • घटनेची गंभीरता लक्षात घेत तपास स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

  • माजी मंत्री राजेश टोपेंनी अधिवेशनात या चोरीचा प्रश्न मांडला.

  • उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाचे आदेश दिले. 

  • चोरीचा छडा लागत नसल्याने भाविकांकडून आंदोलन करण्यात आले. 

  • 21 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. 

  • चोरीनंतर आता 67 दिवशी दोन चोरटे पकडण्यात यश आले. 


देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट...


'जांब समर्थ' येथील येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांच्या कारवाईबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना पोलिसांचे अभिनंदन केले आहे. याबाबत ट्वीट करतांना फडणवीस म्हणाले की, जांबसमर्थ (जालना) येथील समर्थांच्या देवघरातील प्रभूश्रीरामचंद्र आणि सीतामातेच्या चोरीला गेलेल्या ऐतिहासिक मूर्ती सापडल्या. राज्यातील11 हून अधिक जिल्हे आणि शेजारच्या कर्नाटक राज्यात तपास करून आरोपींना अटक करून, ही कामगिरी चोख बजावणार्‍या सर्व पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन! 






Jalna : समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींना अटक; एका आरोपीचा तपास सुरु