मुंबई :  राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही असे चित्र दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट असल्याचं पाहायला मिळत असून आज 43.5 इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे.


गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव जिल्हयात उष्णतेची लाट पसरली आहे.  मात्र गेल्या दोन दिवसात ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले.  एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहींनी शीतपेय तर काहींनी उसाचा रस  पिण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे.


वाढत्या उन्हामुळे गेल्या दोन दिवसापूर्वी एकाचा उष्मा घाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सध्या असलेले उन्हाची लाट अजून काही दिवस अशीच कायम राहिली तर अजूनही उष्मा घाताचे बळी वाढू शकणार असल्याची शक्यता आहे.  एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.  उन्हात बाहेर निघण्याचं टाळावे, शरीराला पाण्याची कमी होऊ देऊ नये, खूप पाणी प्यावे, त्यासाठी ज्यूस, नारळपाणी, ताक यासारखे पदार्थ घ्यावे. 



2-3 दिवसात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ 



दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्मघाताची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha