Jalgaon Couple : लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने (Couple) एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरातील मोंढाळे रोड परिसरात ही घटना घडली आहे. जितेंद्र राजू राठोड आणि साक्षी सोमनाथ भोई असे मयत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
पाचोरा (Pachora) शहरातील वरखेडी नाका परिसरात जितेंद्र राठोड हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास होता. तर याच परिसरात म्हणजे जितेंद्र याच्या घरापासून दोन घरे सोडून काही अंतरावर साक्षी भोई ही तिच्या कुटुंबासह राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी एकमेकांना फोनवरुन संपर्क केला. त्यानंतर रात्रीच घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटायचे ठरले. या ठिकाणी जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून जीवन (Suicide) संपवले. कुटुंबीयांकडून दोघांच्या लग्नाला विरोध होता, तर साक्षीचा तीन दिवसांपूर्वीच विवाह (Marriage) झाला होता, मात्र तिला तो विवाह मान्य नव्हता, म्हणून ती माहेरी आली. या कारणाने जितेंद्र व साक्षी या दोघांनी टोकांच पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजेच्या सुमारास साक्षी हिच्या भावाला जाग आली. तेव्हा त्याने बहिण साक्षी हिचा शोध घेण्यात सुरुवात केली, मात्र ती सापडली नाही. घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी काहीतरी असावे म्हणून त्या ठिकाणी पाहण्यास गेले तर साक्षी व जितेंद्र हे दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती समोर आल्यानंतर जितेंद्र व साक्षी या दोघांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी रुग्णवाहिका चालक अमोल पाटील याला सोबत घेत घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी झाला होता विवाह
दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परिवार आहे. तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. जितेंद्र राठोड याचा परिवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोई हिचा परिवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो. जितेंद्र हा बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. साक्षी भोई हिचा तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जून रोजी विवाह झाला आहे. विवाहनंतर ती रविवारी माहेरी आली होती. याचदरम्यान तिने जितेंद्रशी संपर्क साधला. यानंतर दोघांनी जीवन संपविले. या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून दोघांच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.