Gulabrao Patil : 'मी मोकळा माणूस आहे जे होतं ते सांगतो. मी घाबरत नाही, जे आहे ते आहे, अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधकांकडून गद्दार, खोके अशा शब्दात टीका केली जात असल्याने आम्हाला त्रास होत असल्याची भावना मंत्री गुलाबराव पाटलांनी पंढरपूर (Pandharpur) येथे जाहीर सभेत बोलून दाखवली होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या कार्यक्रमाची मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. या पाहण्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या सभेत 'विरोधकांकडून गद्दार, खोके अशा शब्दात टीका केली जात असल्याने आम्हाला त्रास होत असल्याची भावना मंत्री गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवली होती. यावर आज ते म्हणाले कि, मी मोकळा माणूस आहे जे होतं ते सांगतो. मी घाबरत नाही, जे आहे ते आहे. अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या विषयावर पत्रकारांनी जळगावात त्यांना विचारणा केली असता त्यांनी मी मोकळा माणूस आहे. जे होतं ते सांगतो. कुणालाही घाबरत नाही. अशा शब्दात या विषयाचा पुनरुच्चार केला.


मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, लाभधारकांना बोलवणं याला सक्ती म्हणत नाही, लाभार्थ्यांना जागरक करून आम्ही या कार्यक्रमात आणत असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. खडसेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. असे कार्यक्रम कोणत्याच सरकारने राबवले नाही, उलट त्यांनी अशा कार्यक्रमांना साथ द्यायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात लोकांना सक्तीने बोलावलं जात असल्याची टीका खडसेंनी केली होती. त्या टीकेला गुलाबराव आणि आज जळगावात उत्तर दिलं. हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवला जात आहे. त्यामुळे यासाठी कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही. जे शासकीय योजनांची लाभार्थी आहेत. त्यांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
 


गुलाबराव पाटील यांचे आवाहन 


शासनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस कवायत मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी' या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देवून पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी विविध सुचना पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जून रोजी, जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला अनुदान आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे. 


 


Majha Katta With Gulabrao Patil : बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं....? गुलाबराव पाटील 'माझा कट्ट्या'वर