Crop Insurance: हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) पीक विम्याच्या (Crop Insurance) मुद्यावरून शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. तर या काळात केलेली आंदोलने आणि शेतकऱ्यांकडून सुरु असलेल्या उपोषणाची प्रशासनाकडून अपेक्षीत दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याने, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर दूध सांडत संताप व्यक्त केला आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहे. मागच्या वर्षीसुद्धा विमा कंपनीने करोडो रुपये शेतकऱ्यांचे थकवले होते. तर प्रीमियम पेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. तर लेखी आश्वासन देऊनही पिक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी 18 जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आज उपोषणाचा सहावा दिवस उलटूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याने, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर दूध सांडत संताप व्यक्त केला आहे. 


उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली! 


पीक विम्यासाठी भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. त्यामुळे गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून आमरण उपोषण सुरू केले आहे. पण उपोषणाचा आज सहावा दिवस असून देखील प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान याचवेळी उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळलत चालली आहे. उपोषणकर्त्यांची डॉक्टरांकडून तपासणी देखील करण्यात आली आहे. मात्र आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 


शेतकरी आक्रमक! 


पीक विम्याच्या मुद्द्यावरुन हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक होताना पाहायला मिळाली. तर पिक विमा परतावा मिळावा यासाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज 21 जानेवारीला गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ केली होती. टायर पेटवून देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता. तर 22 तारखेला बंदची हाक देण्यात आली होती. तसेच आज रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 


संबंधित बातम्या: 


Swabhimani Shetkari Sanghatana : हिंगोली जिल्ह्यात पीक विमा आंदोलनाला हिंसक वळण, गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ