Nashik Balasaheb Thackeray : दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांचा लढवय्या बाणा धगधगता विचार पुढील पिढीसमोर असावा यासाठी त्यांचा जीवनप्रवास फोटो बायोग्राफीतून नाशिककरांसमोर मांडण्यात आला. त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षातर्फे मानवंदना देण्यात आली. 


'बाळासाहेबांची शिवसेना' यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) औचित्य साधून कै. रावसाहेब थोरात सभागृहाच्या मैदानावर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. आज सकाळपासून नाशिककरांनी (Nashik) चित्र प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील क्षण स्केचच्या माध्यमातून रेखाटण्यात आलेल्या 5 फूट बाय 800 फूट कापडावर 400 चित्रकृतींतून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 


या प्रदर्शनात (Photo Biography) बाळासाहेब ठाकरे यांच्या आजी, पणजी, आई वडीलांपासून ते त्यांची भावंडे, शिक्षण, विवाह राजकीय चळवळीतले क्षण, राजकीय याबरोबरच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अन्य क्षेत्रातील क्षणचित्रे, शिवसेनेच्या पहिल्या शाखेपासून ते पहिला कुटुंबीयांची चित्रे चितारण्यात आली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक, राजकीय चळवळीतील क्षण राजकिय क्षेत्रातील क्षणचित्रे शिवसेनेच्या पहिल्या शाखांपासून ते शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास दालनात मांडण्यात आला आहे. ठाकरे यांचा इतिहास चित्ररूपाने मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांच्या आजी, पणजी, आई-वडिलांपासून ते आहेत. ठाकरे यांचा सामाजिक, राजकीय जडणघडणीतील इतिहास मांडण्यात आला आहे. 


यावेळी नाशिककरांनी या प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर हाताने बनवलेले 800 बाय ५ फूट आकाराचे पेन्सिल स्केच फोटो बायोग्राफी प्रदर्शनाला भेट दिली. बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने आयोजित या फोटो बायोग्राफीत अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचीदेखील अनेक चित्रकृती मांडण्यात आलेल्या आहेत. बाळासाहेबांबरोबर, कुटुंबीयांसोबत, तसेच कार्यक्रमांच्या चित्रकृतींमध्ये  अनेक ठिकाणी उद्धव यांची देखील चित्रे दिसून येतात. त्यामुळे प्रदर्शनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.


फोटोबायोग्राफी प्रदर्शन 


दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील रावसाहेब थोरात पटांगण येथे भव्य फोटो बायोग्राफी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या ठिकाणी एकाहून एक सरस चित्रे पाहायला मिळत आहेत. नाशिकच्या कलाकाराने हाताने ही सगळी चित्रं काढली असून सर्व वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुक करण्यात येत आहे. या चित्रांद्वारे बाळासाहेबर ठाकरे यांचा सामाजिक, राजकीय जडणघडणीतील इतिहास मांडण्यात आला आहे.