मुंबई : मेंढ्यांचे नेतृत्व लांडग्याकडे दिले असून आता मेंढ्याना या लांडग्याकडे संरक्षण मागावे लागेल अशी अवस्था मागासवर्गीयांची झाली असून अजित पवार मागासवर्गीय मंत्री समितीचे अध्यक्ष कसे आणि मागास पदोन्नतीबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय हे आता मुख्यमंत्र्यांनीच जाहीर करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 


आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये बोलताना महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राज्यातील मागासवर्गीय जनतेत निर्माण झालेल्या गोंधळाचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी मागास पदोन्नतीबाबत झालेला निर्णय रद्द केल्याचे ट्विट केले तर लगेच उपमुख्यमंत्री कार्यालयाने हा निर्णय झाल्याचा खुलासा केला. वास्तविक मागासवर्गीय मंत्री उपसमितीच्या अध्यक्षपदी एखाद्या मागासवर्गीय मंत्री असणे अपेक्षित असताना अजित पवार याना हे पद कसे दिले? 


मागासवर्गीयांचे दुःख यांना काय माहिती असा टोला लागवताना हे म्हणजे मेंढ्यांचे नेतृत्व लांडग्याकडे दिल्यासारखं असल्याचे पडळकर यांनी सांगितले. आता या सर्व गोंधळाचा खुलासा थेट मुख्यमंत्र्यांनी करून मागासवर्गीय जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावे असे आवाहन आपण पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केल्याचे पडळकर यांनी सांगितले . 
        
तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री चक्रवादळाच्या नुकसानीची पाहणी करायला बाहेर पडूनही मदत देण्याऐवजी राजकीय वक्तव्ये करण्यात मग्न असल्याचा टोलाही पडळकर यांनी लगावला. गेल्या वेळी आलेल्या चक्रीवादळाची नुकसान भरपाई अजून कोकणवासीयांना मिळाली नसून वादळाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते नुकसानीची पाहणी करायला गेल्यावर घाबरून मुख्यमंत्री बाहेर पडल्याचा टोलाही पडळकर यांनी लगावला. 


कोकणातील रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले असून मुख्यमंत्र्यांनी आता राजकीय वक्तव्ये करण्यापेक्षा तातडीने मदत द्यावी असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. 


महत्वाच्या बातम्या :