Nashik Lockdown :  कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच प्रशासनाकडून सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक सेवांच्या दुकानांनाही निर्धारित वेळेमध्येच खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण, आता लॉकडाऊन अगदी शेवटच्या टप्प्यात असतानाच पुन्हा एकदा नागरिकांचा बेजबाबदारपणा प्रशासन आणि पोलीस यंत्रणांची डोकेदुखी वाढवत आहेत. 

Continues below advertisement

लॉकडाऊनमध्येही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरोधात आता नाशकात पोलिस अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय विविध ठिकाणी भटकणाऱ्यांना इथं पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला आहे. याशिवाय शटर बंद ठेवून दुकान, हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांनाही पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेला सामोरं जावं लागलं. 

नाशिकमध्ये 12 ते 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इथे केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण, आदेश धुडकावून  नागरिक रस्त्यावर फिरणं मात्र टाळताना दिसत नाहीत. त्यामुळं लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्यात  पोलिस पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. किंबहुना याचे परिणामही दिसत असून, रुग्णसंख्येचा आलेख काहीसा उतरणीला लागला आहे. पण, अशा बेजबाबदार नागरिकांच्या चुकीमुळे कोरोना संकटाची भीती आणखी बळावत आहे. 

Continues below advertisement

CoronaVirus : कोरोनाविरोधातील लढाईत नांदेड जिल्ह्यातील भोसी पॅटर्नची केंद्र सरकार, आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा

गुरुवारी राज्यात 47,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 29,911 नवीन रुग्ण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 47371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 5026308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43% एवढे झाले आहे.