Nashik Crime : नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पंचवटी परिसरात बाप लेकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


सध्या नाशिकसह जिल्ह्यात आत्महत्यांची मालिका सुरूच असून नाशिककरांना अस्वस्थ करणाऱ्या या घटनांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नाशिकममधील पंचवटी परिसरात दोघा बाप लेकांनी आत्महत्या केली. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असे वडील-मुलाचे नाव आहे. 


दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली असून जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असे वडील-मुलाचे नाव आहे. जाधव यांनी आपल्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून हि बाप लेकाची आत्महत्या परिसरात धक्का देणारी ठरली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


नाशिकसह जिल्हाभरात रोज आत्महत्यांच्या बातम्या कानावर पडतात. मागील काही महिन्यांची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल कि, विद्यार्थी- विद्यार्थिनी तरुण, कामगार, गृहिणी, वृद्ध- रुग्ण आदीकडून आत्महत्येचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये कौटुंबिक वाद, पत्नी पत्नीतील भांडण, अनैतिक संबंध, एखाद्या गोष्टीतील अपयश, पैशांची अडचण, मानसिक ताण, कर्ज प्रकरान आदी कारणांतून आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. अनेकदा अधिकारी, डॉक्टर्स, नोकरदार वर्ग, व्यावसायिक आदींनी देखील आत्महत्या केल्याचे पोलिसांकडे नोंदी आहेत. 


अलीकडे एकत्र आत्महत्या करणे, अथवा स्वतःसह कुटुंबाचे जीवन संपविणे हा प्रकार समाजात वाढत चाललेला आहे. मुळात आत्महत्या हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यातून स्वतःच्या कुटुंबातील इतरांना जीवे मारून टाकणे हा अजून गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील लोक जेव्हा असे कृत्य करतात त्यावेळेस जाणवते की, समाजात मानसिक ताण-तणाव किती मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेले आहेत.


मानसोपचार तज्ज्ञ कल्पेश सोनवणे यांच्या मते, कोरोनानंतर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. काहींच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय डबघाईला गेले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली. अशा कारणांमुळे सगळं काही संपल्यासरखे वाटायला लागते, व जगणं निरर्थक वाटायला लागून व्यक्ती नैराश्याला बळी पडते, पुढे यातूनच शेवटचा पर्याय म्हुणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. अशावेळी जीवनात आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी मानसिक आधार व तसेच मानसिक उपचार फार गरजेचे असतात. नैराश्यातील व्यक्तीला जर योग्य वेळीस मानसिक आधार व उपचार मिळाला तर अशा व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून वाचवू शकतो.