सातारा :  राष्ट्रवादी काँग्रेसचा (National Congress Party)  मुख्यमंत्री (Maharashtra CM)  व्हावा म्हणून कार्यकर्त्यांनी तुळजाभवानी देवीला साकडं घातल्यानंतर आता पुढचा मुख्यमंत्री आपलाच असेल असं भाकित केलंय राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Next CM)  यांनी केले आहे. साताऱ्यातल्या डिस्कळमध्ये राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात मुंडे यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार महेश शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही आमदार महेश शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं


येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल असे भाकित केले आहे. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात आले आहे. विविध विकास कामांच्या उद्घाटनाबरोबर त्यांची खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे झालेला शेतकरी मेळावा हा चांगलाच गाजला. यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी पुढच्या वळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचे ही त्यांनी सांगितेल.


धनंजय मुंडे म्हणाले, पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्षे विरोधी पक्षनेता होतो आणि ती जबाबदारी पार पाडली. आज शब्द देतो, सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून  येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील  ते आपलेच असतील. ते म्हणतील हे विभाग आपल्या शिवाय दुसऱ्या कुणालाच नको.


देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला


शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर धनंजय मुंडे म्हणाले, देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. विधानसभेला तुमची चूक झाली. काय गमवले तुम्ही त्याचा हिशोब तुम्ही केला नाही. शशिकांत शिंदे निवडून गेले असते तर ते मंत्री असते. एका गावातील पाण्याचा प्रश्न नाही तर तीन जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला असता.


धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. काहींना दिवसा स्वप्न पडतात असा टोला त्यांनी लगावलाय


एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं काल पनवेलमध्ये तोंडभरून कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस हेच उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत असूच शकत नाही अशा शब्दांत तटकरे यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं.