मुंबई: राज्यातील एक मोठा मतदार वर्ग आपल्या बाजूने करून घेण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मेगा प्लॅन (Mega Plan) आखल्याचं समोर आले आहे. यासाठी एसटी महामंडळाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यात तब्बल एक कोटींच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्यासाठी आता सरकारकडून पुढाकार घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महिन्याच्या प्रत्येक शनिवार- रविवारी जेष्ठ नागरिकांना ही संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी तब्बल दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांना जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिले आहेत. ही सेवा देताना केवळ संबंधित व्यक्तींना आपल्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे. सध्या राज्यात 65 वर्षावरील नागरीकांना 50 टक्के तिकीट तर 75 वर्षांवरील नागरीकांना मोफत प्रवास जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून देवदर्शनासाठी जो प्रस्ताव करण्यात येतं आहे त्यामध्ये सर्वच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे
यामध्ये पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी,शेगाव, कोल्हापूर -जोतिबा दर्शन या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या धर्मशाळा,यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या राज्यात 65 वर्षावरील नागरीकांना 50 टक्के तिकीट तर 75 वर्षांवरील नागरीकांना मोफत प्रवास जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून देवदर्शनासाठी जो प्रस्ताव करण्यात येतं आहे त्यामध्ये सर्वच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत एसटी महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवार -रविवार शासकीय कार्यालये, शाळा - महाविद्यालयांना सुट्टी असल्याने त्याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होतो. या दोन दिवसांत उत्पन्न खूप कमी मिळते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या देवदर्शनाचे आयोजन एसटीने केल्यास, एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल. दर दुसरीकडे ज्येष्ठांना धार्मिक पर्यटनाची संधी उपलब्ध करून देता येईल! असा दुहेरी उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे.
राज्यात सत्तांतर झाले.. शिवसेना फुटली... त्यानंतर खरी शिवसेना कोणाची.... शिवसेनेचे अस्तित्व... यावर चर्चा सुरु झाली. खरी शिवसेना कोणाची यावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरु आहे आणि याच उत्तर मिळणार आहे ते अगामी मुंबई महापालिका निवडणुकीतुन. त्यासाठी सर्वच पक्षानी कंबर कसली आहे. 19 जानेवारील पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात प्रकल्प उद्घाटनांचा धडाका लावला आहे. निवडणुकांची तयारी म्हणून भाजप आणि शिंदे गटाने दहीहंडी उत्सव, गणपती उत्सवात केलेली पाहायला मिळाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गणेशोत्सवामध्ये पायाला भिंगरीलावून विविध गणपती मंडळांना जाताना पाहायला मिळाले होते. एकंदरीच मोठा मतदारसंघ आपल्या बाजूने घेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.