चंद्रपूर : सध्या वरुणराजाचं (Monsoon) आगमन राज्यात लांबलंय आणि त्यातच तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची लाही होतेय. माणसांसोबतच प्राण्यांनाही उकाडा हैराण करतोय. चंद्रपूरमध्ये (Chandrapur) अशाच उष्णतेने तहानलेल्या माकडाचं (Monkey) डोकं तांब्यात अडकलं आणि त्याच्या सुटकेसाठी अन्य माकडांनी गोंगाट सुरु केला. याची माहिती वन विभागाला मिळताच कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्या पिल्लाला जीवनदान दिले.
ही घटना शहरात माहित होताच माकडाच्या पिल्लाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्याचं झालं असं की, चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या एका माकडाच्या पिल्लाचं डोकं एका तांब्यात अडकलं. या माकडाच्या पिल्लाला पाण्याने भरलेला तांब्या दिसता. तांब्यावर झडप घालून पाणी पिल्यानंतर पिलाचं तोंड त्या तांब्यातून निघेना. ते पिल्लू सैरावैरा पळू लागलं. तहान भागविण्यासाठी पिल्लाने त्याच्यामध्ये मान टाकली. मात्र हा तांब्या मानेत फिट्ट बसला. पाणी नाही आणि मानही बाहेर काढता येत नसल्याने माकडाच्या पिल्लाची तांब्या काढण्यासाठी धडपड सुरु झाली.
डोकं अडकलेलं ते माकड छोटं पिल्लू असल्याने अन्य माकडं त्याच्या सुटकेसाठी जास्त कासावीस झाली. या सगळ्यामध्ये वनविभागाला या पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी सात तास लागले. मोठ्या प्रयत्नाअंती हा तांब्या कापण्यात आला आणि माकडाची सुटका झाली. उन्हाळ्यात, जेव्हा जंगलातील सर्व जलस्रोत आटतात आणि अन्न उपलब्ध होत नाही, तेव्हा अनेकदा माकडांचे कळप अन्नाच्या, पाण्याच्या शोधात असतात.
संबंधित बातम्या :