मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव आज मुंबईत आहेत. दुसरीकडे कोरोना झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्येच पाहायला मिळाले. फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ही बैठक भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाली. फडणवीसांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती दर्शवलीय. दरम्यान भाजपच्या या बैठकीनंतर भाजपची पुढची रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान भाजपच्या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय होणारच असा ठाम विश्वास शेलारांनी यावेळी व्यक्त केलाय. सोबतच राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या आहेत. यासाठी भाजपसह महाविकासआघाडीनेही आपल्या आमदारांबाबत खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतयं. यावरून शेलारांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधाला आहे.
आशिष शेलार म्हणाले, भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय होणार आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय होणार नाही. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप त्यांनी केले आहे. लोकशाहीत आजवर असे कधी झाले नव्हते. संजय राऊत यांचे बोलणे हे बालीशपणाचे आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित पराभव दिसत असेल त्यामुळे ते असे बोलत आहे. सतेज पाटील यांनी कोल्हापूरातील त्यांचे आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळले तरी खूप आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला गेले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत, खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित आहे महाराष्ट्राचा आमदारांचा घोडेबाजार सुरु असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घ्यावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर हा गुन्हा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणीही सोमय्यांनी केलीय.
संबंधित बातम्या :