Ambadas Danve On Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला आहे.  दरम्यान आता या अर्थसंकल्पावरून वेगवेगळ्या क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळातून देखील अशाच काही प्रतिक्रिया येत आहे. ज्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षीचे अर्थसंकल्प म्हणजे आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन फक्त मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्याचं दानवे म्हणाले आहे. 


मोदी सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, हे अर्थसंकल्प म्हणजे 2024 ची निवडणूक लक्षात घेऊन मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतीचा विचार केला तर, शेतकऱ्यांसाठी यापूर्वी ज्या काही घोषणा करण्यात आल्या होत्या त्याची आज काय स्थिती आहे. स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी करण्याचा निर्णय, अर्थात शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्च आधारित भाव द्यावा. पण आजच्या अर्थसंकल्पात याचा कुठेही उल्लेख नसल्याचे दानवे म्हणाले. 


कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चुकीचे धोरण 


पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, तर आजच्या अर्थसंकल्पात सरकराने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली. पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काय मदत लागते? त्यांना फक्त चांगला भाव मिळाला पाहिजे. या सरकारने बाहेर देशातून कापूस आयात देखील नसती केली, तर शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला असता. त्यामुळे एकीकडे मदतीची घोषणा करायची आणि दुसरीकडे चुकीचे धोरण राबवून शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडले जात असल्याचं दानवे म्हणाले. 


महागाई,बेरोजगारीचं काय? 


नवीन कर प्रणालीची घोषणा करण्यात आली आहे, मात्र त्यातून गुंतवणूकीला प्राधान्य मिळणार नाही. यात काही लोकं थोडीथोडी गुंतवणूक करतात. त्यामुळे नवीन कर प्रणालीचा गुंतवणूकीला फायदा होणार नाही. याचा फायदा फक्त जास्त उत्पन्न कमवणाऱ्या लोकांना होणार आहे. वित्तीय तुट पहिली तर, 2014 ची आणि आत्ताची दुप्पटीने वाढली आहे. दोन कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, त्याचे काय झाले. त्यात महागाई गगनाला भिडली आहे, पेट्रोल-डीझेलचे दर वाढले आहेत. जनतेला ज्या गोष्टींशी देणघेणं नाही अशा गोष्टीचे दर कमी करण्यात आले आहे. सोबतच महिलांना देखील या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नसल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Budget 2023: कृषी क्षेत्राला मोठ्याप्रमाणावर प्राधान्य; अर्थसंकल्पावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया