Aashadhi Wari 2023: विठ्ठल भेटीची ओढ... आज संतांच्या पालखी सोहळ्यासोबतच लाखो वैष्णवांच्या मेळ्याचा पंढरीत प्रवेश
K Chandrashekar Rao Live Updates : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत तेलंगणाचे संपूर्ण मंत्रीमंडल आहे.
पार्श्वभूमी
CM K Chandrashekar Rao Live Updates : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज ते आणखी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. ते त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळासह पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालं आहेत. मात्र, फक्त के. चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार असून त्याच्यासोबत आलेल्या इतर मंत्री, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नसल्याचं मंदिर प्रशासना स्पष्ट केलं आहे. आषाढी वारी सुरू असल्याने व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. हे सगळेजण मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घेणार आहेत. चंद्रशेखर यांच्या सोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, त्यांच्या सर्व आमदार आणि खासदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. या सर्वांना व्हिआयपी दर्शन देता येणं शक्य होणार नाही असं मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी हे शेकडो किलोमीटर चालून विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. अशावेळी व्हीआयपी दर्शनामुळे त्यांच्या दर्शनामध्ये खोळंबा होतो. त्यामुळे यंदापासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच आता केवळ तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार असून आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांना सर्वसमान्यांच्या रांगेतून दर्शन घ्यावं लागणार आहे.
राजशिष्टाचारानुसार एखादा राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री येत असताना त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणे गरजेचे असते, मात्र केवळ राजकारणापोटी केसीआर यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी परवानगी नाकारण्यात आली आहे असा आरोप बीआरएस पक्षाकडून करण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -