गोंदिया : थकित वेतनासाठी वन मजूराने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन (Shole Styele Protest) करत विरुगिरी केल्याची घटना गोंदिया शहरातील (Gondia News) कुडवा येथे घडली आहे. गावातील सामाजिक वनविभागाच्या कार्यालय (Forest Office Area) परिसरात ही घटना घडली आहे.. गौरीशंकर चौहान असं संबधित मजूराचं नाव असून तो चुटिया या ठिकाणचा रहिवाशी आहे. संबधित वन मजूर हा रोजंदारीवर काम करत होता.
गौरीशंकर हा वनविभागाच्या उद्यानात रोजंदारीने काम करीत होता, मात्र 2018 ते 2019 या वर्षीच्या तब्बल 9 महिन्यात केलेल्या कामाचे वेतन त्याला अद्याप मिळाले नव्हते. तर दुसरीकडे कोरोना काळानंतर उद्यान बंद झाल्याणे त्याला कामावरुन कमी करण्यात आले आहे. प्रशासनाला वारंवार मागणी करून ही कोणतेही ठोस उपाय न केल्याने आज अखेर त्याने आपले 9 महिन्यांचे थकित वेतन 1 लाख 6 हजार 560 रुपये मिळावे आणि पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी आंदोलन केले. तो पेट्रोल घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करु लागला. याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी यांनी घटना स्थळ गाठत वेळीच त्याच्या मागण्यांची दखल घेतल्याने 2 तासानंतर गौरीशंकर पाण्याचा टाकीवरुन खाली उतरला. मागण्या मान्य झाल्याने अखेर गौरीशंकरने आपले आंदोलन मागे घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! सेवानिवृत्तीच्या दोन तास आधी गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, धुळ्यातील घटनेने खळबळ
- सरकारकडून मोबदला हवाय तर 15 हजार द्या; लाच मागणारी महिला तलाठी फरार
- Extortion Case: अंगडिया व्यवसायिकांनी मला लाच देण्याचे आमिष दाखवले, त्रिपाठी यांनी अधिकाऱ्यांना दिले पुरावे
- Beed: सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाच प्रकरणात अटक; पदोन्नतीच्या आनंदावर विरजण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha