BJP leader Kirit Somaiya :  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. या झटापटीत किरीट सोमय्या खाली कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी  शिवसैनिकाला अखेर अटक करण्यात आली.  सनी गवते असे अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. आज दुपारी या अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाला शिवाजीनगर कोर्टमध्ये हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.


पुण्यातील घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. " मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब आणि रश्मी ठाकरे यांच्या भावाचा पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचारात सहभाग आहे. त्यामुळे हे सर्व जण अस्वस्थ झाले होते. माझ्यावर हल्ला करण्याचा हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करत पुणे महापालिका कार्यालयाला सुट्टी असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आत कसे घुसले? असा प्रश्न किरीट सोमया यांनी उपस्थित केला आहे. 


"पुणे महानगर पालिकेला सुट्टी असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आत कसे गेले? सुट्टी असतानाही कार्यकर्ते आत जाऊन गनिमी काव्याने हल्ला करणार असे नियोजन होते. किरीट सोमय्या यांचे हात-पाय तोडा असं आधीच सांगितलं होतं, माझ्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग होता, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला होता.  सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हल्ला करतायत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 




 



इतर महत्त्वाच्या बातम्या :