बीड : बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी अर्जुन कुंडलीक साळुंके यांनी 24नोव्हेंबर 2020 मध्ये  पाटबंधारे कार्यालय बीड येथे पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्मदहन केले होते. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बीड ,भूमी अभिलेख उपअधीक्षक,बीड उपजिल्हाधिकारी बीड  या तीन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल दाखल झाला होता. यातील अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट या तीन अधिकारी अर्जुन सोळंके यांच्या पत्नी ताराबाई यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप ताराबाई यांनी केला आहे.  त्या अधिकाऱ्यावर ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बिंदुसरा धरण सांडव्याच्या  स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. 


भूमीअभिलेख कार्यालयाकडून एकत्रिकरणात  झालेल्या अनियमिततेमुळे अर्जुन कुंडलिक साळुंके यांचे संपादित क्षेत्र व उर्वरित क्षेत्र यांच्यात गुंतागुंत होऊन कमी झाल्याने त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. मात्र या प्रकरणी संबंधित सरकारी अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून हताश झालेल्या अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी  24 नोव्हेंबर 2020 रोजी अंगावर पेट्रोल ओतून  बीड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात पेटवून घेत आत्मदहन केले होते.  या घटनेप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.


घरातील कर्ता पुरुष अकाली व धक्कादायकरित्या गेल्याने पीडित परिवाराचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांनी गुन्हा परत घेण्यासाठी पीडित कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



CM Uddhav Thackeray: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण


Republic Day : ऐतिहासिक क्षण; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा फडकला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha