Pune Bypoll Election : पुण्याच्या (Kasba Bypoll Election पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.( pune bypoll election ) पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र या सगळ्या प्रचार यात्रेत दिवंगत आमदार मुक्ता टिळकांचे चिरंजीव कुणाल टिळक (kunal tilak) आणि मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांच्या उपस्थितीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंब नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भाजपच्या मनधरणीनंतर कुणाल टिळक प्रचार यात्रेत सहभागी झाले होते.
कुणाल टिळक म्हणाले की, आम्हाला उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या सोशल मीडियावर आणि सगळीकडे चर्चा रंगल्या होत्या. मात्र ब्राह्मण समाज नाराज आहे की नाही हे येत्या 2 मार्चला कसब्याच्या निकालाच्या दिवशी सर्वांसमोर येईल. मात्र आम्ही नाराज नाही, असं स्पष्टीकरण कुणाल टिळक यांनी दिलं आहे.
कुणाल टिळक म्हणाले की, ब्राह्मण समाज नाराज आहे, अशा चर्चा माध्यमांनी आणि सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र 2 मार्चला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल त्यावेळी भाजपचा उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आल्यावर कोण किती नाराज आहे, हे स्पष्ट होणार आहे. प्रचाराची आजपासून सुरुवात झाली आहे. त्यात मोठ्या संख्येनं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मी देखील या प्रचार यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झालो आहे. शंभर टक्के या पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आज सकाळी ओंकारेश्वर मंदिरापासून रॅली काढण्यात आली होती. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, शैलेंद्र चव्हाण, नाना भानगिरे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभारी धीरज घाटे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर घरातील दोघांची नावं चर्चेत होते. शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता होती. मात्र ऐन वेळी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे टिळक कुटुंबीय नाराज आहे, अशा चर्चा रंगल्या शिवाय ब्राह्मण समाजाला डावललं जात आहे, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.