Aaditya Thackeray On Sandipan Bhumre: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आपल्या याच शिवसंवाद यात्रेतून आदित्य ठाकरे शिंदे गटावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. तसेच ज्या ठिकाणी यात्रा जात आहेत तेथील शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यावर देखील आदित्य ठाकरे टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचवेळी त्यांनी आज औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन येथील सभेत शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर निशाणा साधला. भुमरे यांच्या दारूच्या दुकानावर होत असल्याचा  आरोपावरून आदित्य यांनी, 'त्यांची (दारूच्या दुकानं) किती आहेत? मी ऐकलं बारा आहेत', असा खोचक टोला लगावला. 


आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरु असतानाचं खाली बसलेल्या एकाने संदिपान भुमरे यांनी नवीन गाडी घेतली असल्याचं ओरडत सांगितले. यावरच बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गाडी तर घेतलीच आहे. पण मी ऐकलं आहे की, भुमरे औरंगाबादचे पालकमंत्री झाल्यावर त्यांनी पहिले काम म्हणजे, बरेच स्पीड ब्रेकर (दारूच्या दुकानाजवळ) लावले आहे. म्हणजे गाडी हळू झाली की, दुकान दिसेल. दुकान दिसले, तर किती आहेत (दुकानं)...मी ऐकलं बारा आहेत. मोजून बघा एकदा, माहिती काढा असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पण जाऊ द्या अशा लोकांचा जास्त समाचार घायचा नाही. जे काही गतिरोधक आहे ते आपली सरकार आल्यावर सरळ करून टाकू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


गद्दार गॅंगमधील कृषीमंत्री कुठे आहेत...


दरम्यान याचवेळी आदित्य ठाकरे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर देखील टीका केली आहे. पण आज काही दिसत असलेला महाराष्ट्रातील चित्र योग्य दिसत नाही. जून-जुलैमध्ये जे काही अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. मात्र गद्दार गॅंगमधील कृषीमंत्री पाहिला आहे का? कृषीमंत्री कधी शेतकऱ्यांच्या बांधावर आले आहेत का?, आम्ही सतत नुकसानभरपाई जाहीर करा म्हणून आंदोलन करून यांना खुर्ची खाली करा म्हणत विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केले. मात्र हे लोकं खुर्चीला चिटकून बसले आहेत. 


लवकरच 40 गद्दार बाद होणार... 


महाराष्ट्राला आम्ही सुवर्णकाळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना, कोणाच्यातरी पोटात ते दुखत होते. त्यामुळे त्याने या 40 गद्दारांना सोबत घेऊन गद्दारी करायला लावली, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसायला लावला. बरं सरकार पडल्यावर लोकशाही पद्धतीने हे 40 गद्दार राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही आणि निवडणूक लागली नाही. यांनी घटनाबाह्य सरकार बनवली. मात्र हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. एक-दोन महिने आपल्याला त्रास सहन करावा लागणार असून, आज ना उद्या हे चाळीश गद्दार बाद होणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी 25 अधिकारी अन् 200 कर्मचारी; पोलिसांकडून खबरदारी