Beed Crime News: बीड जिल्ह्यातील (Beed District) केज तालुक्यात एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील पिसेगाव जिल्हा परिषद शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात झालेल्या वादात एकाला मारहाण करण्यात आली आहे. मात्र वाद एकाशी अन् मारहाण दुसऱ्यालाच करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच जणांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताई नवनाथ लांडगे (वय 40 वर्षे, रा. पिसेगाव) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. दरम्यान 6 फेब्रुवारीला पिसेगाव गावातील जि. प. शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ताई या आपला मुलगा महेश आणि मुलगी अंजलीसोबत गेल्या होत्या. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु झाला आणि दोन गाणे झाल्यानंतर रात्री 9 वाजेच्या सुमारास गावातील महेश चंद्रकांत लांडगे आणि नितीन माउली नेहरकर या मुलांमध्ये भांडण झाले. मात्र उपस्थित लोकांनी हस्तक्षेप केल्याने त्यानंतर हा वाद मिटला व पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. 


महेश चंद्रकांत लांडगे आणि नितीन माउली नेहरकर या मुलांमध्ये झालेले भांडण मिटल्यावर कार्यक्रम सुरु झाला. मात्र काही वेळाने तेथे सचिन रामहरी नेहरकर हा आला. यावेळी त्याने काही एक चौकशी न करता वाद झालेल्या महेशला सोडून थेट महेश नवनाथ लांडगे यालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याची आई ताई लांडगे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता सचिनचे इतर साथीदार आले व त्यांनीही जातीवाचक शिवीगाळ करून माय लेकरास बेल्ट व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी इतरांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. 


पोलिसात गुन्हा दाखल... 


कोणतेही चुकी नसताना महेश नवनाथ लांडगे याला मारहाण झाल्याने, ताई लांडगे यांच्या फिर्यादीवरून सचिन रामहरी नेहरकर, नितीन माउली नेहरकर, दत्ता रामहरी नेहरकर, व्यंकटेश दिनकर नेहरकर, इंद्रजित हनुमंत नेहरकर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला. सहायक अधीक्षक पंकज कुमावत तपास करीत आहेत.


गोंधळाचे वातावरण... 


दरम्यान स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमात अचानक झालेल्या वादामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरवातीला महेश चंद्रकांत लांडगे व नितीन माउली नेहरकर यांच्यात वाद झाला. पण उपस्थित लोकांनी वाद मिटवला. पण त्यानंतर तेथे सचिन रामहरी नेहरकर आला आणि त्याने थेट महेश नवनाथ लांडगे यालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकाच गोंधळ उडाला. तर आपल्यावर अचानक हल्ला झाल्याने महेश नवनाथ लांडगे देखील गोंधळला होता. मात्र लोकांनी मध्यस्थी केल्याने करत वाद मिटवला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : चोरी केलेले दागिने 10 दिवसांनी मिळाले परत, घरासमोर दागिने ठेवून चोर पसार