Sandipan Bhumre On Aaditya Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी पैठणच्या बिडकीन येथे घेतलेल्या सभेतून शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आता भुमरे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर दिले आहे."आदित्य ठाकरे बोलतो काय, त्याची उंची किती, तो आमच्या नातवा सारखा असून, आम्हाला अरे तुरे बोलतो अशी टीका भुमरे यांनी केली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) नांदर गावातील सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भुमरे म्हणाले की,"आदित्य ठाकरे बोलतो काय, त्याची उंची किती, तो आमच्या नातवा सारखा आहे. पण तरीही आम्ही त्यांचा मान ठेवतो. मात्र तो आम्हाला आरे तुरे करतो. जरी तो आमचा नेता असेल, पण माणसाने मान सन्मान ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपल्या वयामानाने बोलले पाहिजे”, असे भुमरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी बोळीत सभा घेतली...
पुढे बोलताना भुमरे म्हणाले की, "विकासकामे होत नसल्याने आम्ही उठाव केला होता. जरी आम्हाला खोके म्हणत असाल, बोके म्हणत असाल, पण यांच्याकडे दुसरं काही बोलण्या सारखं काहीच नाही. गद्दार आणि खोके याशिवाय यांच्याकडे कोणताही इतर विषय नाही. काल आदित्य ठाकरे बिडकीनला आला आणि एका बोळीत सभा घेतली. तालुक्यात माझी आज सहावी सभा आहे. आदित्य ठाकरे यांनी तालुक्यात तीन सभा घेतल्या, सुषमा अंधारे यांची एक सभा झाली. रोहित पवार यांची एक सभा झाली आणि आज अजित पवार यांची सभा आहे. पण तुम्ही सगळे जरी आलात आणि कितीही सभा घेतल्या तरीही इथे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही.
यांचे 50 आमदार का फुटले...
विरोधकांना कितीही आरोप करू द्या, साधे ग्रामपंचायत सदस्य लवकर फुटत नाही. पण आम्ही 50 आमदार गेलो, 13 खासदार गेलो. त्यामुळे यांनी चिंतन करायला पाहिजे. आपल्या जवळील 50 आमदार कसे काय गेले. लोकं पैशाने जात नसते. आम्ही जो उठाव केला त्याचं कारण म्हणजे, गेली अडीच वर्षे हे घरातून बाहेर निघाले नव्हते. पण आम्ही उठाव करताच आदित्य ठाकरे तीन वेळ पैठणला येऊन गेले. पण माझं त्यांना आवाहन आहे की, गद्दार आणि खोके सोडून तुम्ही कामे काय केले हे सांगावे, असे भुमरे म्हणाले.
उरलेले आमदार देखील आमच्या संपर्कात
ठाकरे गटात किती लोकं राहिले आहे. त्यांच्याकडे 15-16 आमदार राहिले आहेत. मात्र त्यातील देखील अनेकजण आमच्या संपर्कात असून, ते आमच्याकडे येणार आहे. आम्ही ओरिजिनल बाळासाहेबाच्या शिवसेनेचे आहोत. आम्हीच खरे असून, आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. आपण सर्वांनी संघटना वाढवली असून, आपणच बाळासाहेब यांच्या विचाराचे आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aaditya Thackeray: 'भुमरेंची किती आहेत? मी ऐकलं बारा आहेत...', आदित्य ठाकरे म्हणाले