Aurangabad News: सोशल मीडियावर आपले अधिकाधिक फॉलोवर्स असायला हवे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग देखील करतात. मात्र फॉलोवर्सचा आकडा अधिक असण्याचा क्रेज आता राजकीय नेत्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता निवडणुकीत उमेदवारी देतांना राजकीय गणितासोबतच इच्छुकांच्या सोशल मीडियावर असलेले  फॉलोअर्स देखील पहिले जात आहे. तुमच्या सोशल मीडियावर असलेले खाते किती सक्रीय आहेत आणि तुमचे फॉलोअर्स किती याचा अभ्यास उमेदवारी देताना केला जात आहे. त्यामुळे आपलं सोशल मीडियाचं अकाऊंट सांभाळण्यासाठी चक्क प्रोफेशनल लोकांची निवड राजकीय नेतेमंडळी करतायत. 


सर्वाधिक तरुण असलेल्या भारता सारख्या देशातील हल्लीच्या पिढीचं फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर आणि इंस्टाग्राम ही सोशल मीडिया अकाऊंट त्यांचं बायोडेटा बनला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांमध्ये तरुणाची संख्या अधिकाधिक आहे. त्यामुळे साहजिकच मतदानात या तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आणि परिणामकारक ठरतो. त्यामुळे याच तरूण मतदारांना शक्य तितक्या सर्व मार्गांनी आपलंसं करण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी प्रयत्न करत असतात. साधारणपणे मतदारांचा वावर जिथे जास्त असतो, अशा ठिकाणी मार्केटिंग केल्यास सर्वाधिक फायदा मिळतो असं व्यावहारिक गणित सांगतं. राजकारणातही हे तत्व लागू पडतं. असंही म्हटलं जातं की, 2014 ची निवडणुकीत सत्तांतरात सोशल मीडियाचा मोठा वाटा मोठा होता. त्यामुळेच आपलं सोशल मीडिया नेटवर्किंग दमदार करण्यासाठी नेतेमंडळी सुद्धा प्रयत्न करतायत. 


 नेतेमंडळी यांना प्रचार करणं सोपं होत आहे


एका आकडेवारीनुसार फेसबुक वापरण्यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या भारतात आजघडीला तब्बल 30 कोटी फेसबुक अकाउंट आहेत. दुसर्‍या क्रमांकावर असलेली अमेरिका 21कोटींवर आहे. देशात ट्विटर वापरणाऱ्यांचा आकडा देखील 34 कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं जात. तर व्हॉट्सअपही वीस ते पंचवीस कोटी भारतीय वापरतात. जिथे इतकी मोठी लोकसंख्या सोशल मीडियावर आहे, तिथे नेतेमंडळी यांना आपला प्रचार करणं देखील सोपं होत आहे. तसेच एकाचवेळी लाखो लोकांपर्यंत आपला विचार पोहचवणे आणि त्यांच्या संपर्कात राहणं सोपं झाले आहे. 


महाराष्ट्रातील महत्वाचे नेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय


कधीकाळी मोठमोठ्या सभा, मंडपातील गर्दी, कार्यक्रम, सोशल गॅदरिंग आणि बैठका अशा ठिकाणी नेतेमंडळी आपल मतदार शोधायचे. अशा ठिकाणी हजेरी लावल्याने लोकांशी आपला संपर्क कायम असल्याच त्यांना वाटायचे. एवढंच नाही तर, लग्न, अंत्यविधी, साखरपुडे आणि कंदुरी सारख्या ठिकाणी देखील नेते हजेरी लावत होते. पण आता हीच मंडळी सोशल मीडियावर सापडत आहे. 'करलो दुनिया मुठ्ठी मे' म्हणत छोटासा मोबाईल आपलं जग बनलं आहे. त्यामुळेच राजकारणात देखील सोशल मीडियाला महत्त्व आले आहे. तर महाराष्ट्रातील महत्वाचे नेते देखील सद्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. 


कोणत्या नेत्याचे किती फॉलोअर्स


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  
Twitter: 939 k
Facebook : 945 K


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Twitter: 5.7 M
Facebook: 09 M


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार 
Twitter: 2.7 M
Facebook: 867K


मनसे प्रमुख राज ठाकरे   
Twitter: 1.6 M
Facebook: 01 M


नितीन गडकरी 
Twitter: 12.2 M 
Facebook: 2.2 M


शिवसेना खासदार संजय राऊत  
Twitter: 1.2 M 
Facebook: 205 K


विरोधी पक्षनेते अजित पवार  
Twitter: 1.4 M
Facebook: 685 K


उद्धव ठाकरे  
Twitter: 1.6 M (Office)
Facebook: 473 K


युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे   
Twitter: 3.4 M
Facebook: 388 K


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  
Twitter: 327 K
Facebook: 181 K


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 
Twitter: 381 K
Facebook: 206 K


इम्तियाज जलील 
Twitter: 327 K
Facebook: 583 K


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News : 'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला, लंडनचा एडवर्ड आणि औरंगाबादची सांची अडकले विवाहबंधनात