Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. पोलिसांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक नसल्याने औरंगाबाद शहराचा बिहार होते की, काय अशी चर्चा पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या आवारात दारू पिऊ देत नसल्याने वॉचमनवर गुंडांनी चाकू हल्ला केला आहे. ज्यात हा वॉचमन गंभीर जखमी झाला आहे. तर या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेच्या आवारामध्ये दारू का पिऊ देत नाही म्हणून, रात्रीच्या वेळी गुंडांनी शाळेमध्ये वॉचमन असलेल्या तरुणांवर चाकू हल्ला केला आहे. या जीवघेणा हल्ल्यामध्ये वॉचमन गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला आणि पायावर गंभीर इजा झाल्या आहेत. या हल्ल्यात  वॉचमनच्या डोक्यावर चाकूने वार केल्याने 17 टाके पडले आहेत. ही घटना 27 जानेवारीची असून, याचा सीसीटीव्ही फुटेज आत्ता समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या हिमायत बाग परिसरामधील बीएफसीआय नावाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गुंडाच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


पोलिसांवरही आरोप...


औरंगाबादच्या हिमायत बाग परिसरामधील बीएफसीआय नावाच्या शाळेत एक तरुण वॉचमन म्हणून कामाला आहे. दरम्यान याच शाळेच्या आवारात काही गुंड प्रवृत्तीचे लोकं दारू पिण्यासाठी आले होते. मात्र शाळेच्या परिसरात दारू पिण्यास सदर वॉचमनने विरोध केला. तसेच इथ दारू पिऊ नका म्हणून, विनंती केली. पण यावेळी गुंडांनी विरोध करणाऱ्या वॉचमनला शिवीगाळ करत, त्याच्यावर चाकू हल्ला. ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. मात्र या सर्व प्रकरणात पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करायला हवे होते, मात्र ते करण्यात आले नसल्याचा आरोप शाळेच्यावतीने करण्यात आला आहे आहे. त्यामुळे या घटनेने औरंगाबादमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. 


शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. 


औरंगाबाद शहरातील गेली काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना पाहता, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याची परिस्थिती आहे. कारण महिला अत्याचार, हत्या आणि अवैद्य धंदे वाढले असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. तसेच गुन्हेगारी वृत्ती देखील वाढत आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या महिन्यात औरंगाबाद शहर पोलीस दलातील एसपीवरच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातच आता गुंडांकडून दारू पिऊ दिली नसल्याने शाळेच्या वॉचमनवर चाकू हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime News: घोटाळ्यात आरोपीला चार वर्षांनंतर बंगळुरमधून अटक; बचावासाठी वापरायचा इंटरनेट सीम