Aurangabad Condom Industry: उद्योग क्षेत्रात 'ऑटो हब' (Auto Hub) म्हणून औरंगाबादची (Aurangabad) एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. बजाज (Bajaj), स्कोडा(Skoda),एनड्युरन्स टेक्नोलॉजीसह (Endurance Technologies), छोटी मोठी एकूण चार हजार उद्योग औरंगाबादच्या इंडस्ट्रीमध्ये (Aurangabad Industries) आहेत. त्यामुळे या शहराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता याच औरंगाबाद शहराची 'कंडोम इंडस्ट्री' (Condom Industry) म्हणून आणखीन एक नवी ओळख निर्माण होतेय. कारण औरंगाबादच्या इंडस्ट्रीतून तब्बल 36 देशांना कंडोम पुरवला जात आहे. विशेष म्हणजे भारतात कंडोम निर्मितीच्या दहा कंपन्या असून, त्यापैकी सहा कंपन्या एकट्या औरंगाबादेत आहेत.
कंडोमचं नाव घेतला तरी लोकांमध्ये संकोच आणि लज्जा पाहायला मिळते. यावर बोलण्यास आपल्याला संकोचही वाटतो. पण आता हाच कंडोम एका शहराला आपली वेगळी ओळख निर्माण करून देत आहे. औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला ऑटो हब म्हणून ओळख मिळाल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल, पण त्याच औरंगाबादला आता 'कंडोम इंडस्ट्री'चा माहेरघर अशी ओळख मिळत आहे. कारण याच औरंगाबादेतून 36 देशांना कंडोम पुरवला जात आहे. विशेष बाब म्हणजे, देशात असलेल्या कंडोम निर्मितीच्या एकूण 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्या एकट्या औरंगाबादमध्ये आहेत.
औरंगाबादेत महिन्याकाठी 100 मिलियन कंडोम तयार होतात
औरंगाबादच्या 'कंडोम इंडस्ट्री'ला कंडोम तयार करण्यासाठी लागणारा रबर केरळ आणि तामिळनाडू राज्यातून आणला जातो. तर लॅटेस्ट नावाच्या झाडापासून हे रबर तयार केले जाते. औरंगाबादमध्ये कंडोमची उत्पादन क्षमता ही महिन्याकाठी 100 मिलियन पिसेसची आहे. तयार झालेल्या कंडोमचा प्रामुख्याने युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि काही आशियाई देशामध्ये पुरवठा केला जातो. यातून वर्षाकाठी 200 ते 300 कोटींची उलाढाल होत असते. तर औरंगाबादमध्ये असलेल्या 'कंडोम इंडस्ट्री'मुळे जवळपास दोन हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. ज्यात कामसूत्र, नाईट रायडर्स पासून ते अनेक ब्रँडचे कंडोम औरंगाबादमध्ये तयार होतात. शिवाय याठिकाणी 40 ते 50 फ्लेवरचे कंडोम तयार होतात.
भारतातील दुसरा सर्वात मोठा कंडोम ब्रँड औरंगाबादेत तयार होतो
भारतातील दुसरा सर्वात मोठा कंडोम ब्रँड म्हणून ओळख असलेल्या रेमंड ग्रुपचा कामसूत्र कंडोम देखील औरंगाबादमध्ये बनवला जातो. 1991 मध्ये कामसूत्र कंडोम बाजारात आला होता. या कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 300 मिलियन कंडोमची आहे. तर गेल्यावर्षी त्यांनी तब्बल 320 मिलियन कंडोम तयार केले होते. विशेष म्हणजे भारतात बहुतांश वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. मात्र रेमंड ग्रुपचा कामसूत्र कंडोम चीनला निर्यात केला जातो. रेमंड ग्रुप दरवर्षी चीनला अंदाजे 36 करोड कंडोम निर्यात करत असल्याची माहिती कंपनीचे मॅनेजर बाबू आयर यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा! अब्जाधीशांच्या यादीत शहरातील सहा उद्योगपतींचा सहभाग