Aurangabad City Bus: औरंगाबाद महानगरपालिकातर्फे (Aurangabad Municipal Corporation) शहरात सुरु असलेल्या सिटी बसची (City Bus) स्टेअरिंग माजी सैनिकांच्या (EX Soldier) हाती पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेमध्ये 112 माजी सैनिकांना भरती करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या (ST Mahamandal) संपामुळे सिटी बसच्या सेवेत खंड पडला होता. यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटीने (Aurangabad Smart City) जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने 112 माजी सैनिकांना भरती केले आहे. ज्यामध्ये 85 चालक-वाहक, 18 मेकॅनिक, 5 बस लाईन इन्स्पेक्टर व 4 ट्रॅफिक कंट्रोलर यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाहक-चालक अभावी अनेक सिटी बस जागेवरच उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे शहरातील सिटी बस पूर्ण क्षमतेने कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान आता सिटी बस सेवा लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे प्रयत्न करीत असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
देशातील पहिलाच उपक्रम...
तर जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या मेजर सयेदा फिरासत ह्यांच्या सहकार्यद्वारे स्मार्ट सिटीला माजी सैनिक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शहरातील सिटी बसची स्टेअरिंग या माजी सैनिकांच्या हाती देऊन सिटी बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील हा पहिलाच उपक्रम आहे, जिथे स्मार्ट सिटी प्रकल्पात माजी सैनिकांकडून एवढ्या मोठ्याप्रमाणावर सेवेत घेण्यात आले आहे.
सिटी बसला एसटी महामंडळाच्या संपाचा फटका...
आधी कोरोनामुळे सिटी बस सेवा विस्कळीत झाली होती. मात्र त्यातून सावरत पुन्हा बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न महानगरपालिका प्रशासने केला असतानाच, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली. वाहक-चालक संपावर गेल्याने सिटी बसची सेवा देखील ठप्प झाली होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या बस जागेवर उभ्या होत्या. त्यातून मार्ग काढत पुन्हा सिटी बस सुरु करण्यात आली, मात्र सद्या 58 बसेस 20 मार्गावर धावत असून, 40 बस जागेवर उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थिती बस सेवा सुरळीत करण्यासाठी आता माजी सैनिकांची भरती करण्यात आली असून, उभ्या असलेल्या बसेस रस्त्यावर कशा धावतील यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.
ठरलं! येत्या सहा महिन्यात औरंगाबादच्या रस्त्यांवर धावणार 35 इलेक्ट्रिक बसेस; 'एसी'ची ही असणार सुविधा