Maharashtra Politics: निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाला दिला आहे. दरम्यान याच काळात राज्यात पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) चर्चा पाहायला मिळत असून, अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी अपेक्षा लावून बसलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. तर ठाकरे गटावर बोलताना त्यांच्याकडून येणाऱ्या तिखट प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय ठरत आहे. 


शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी संजय शिरसाट यांचे नाव अंतिम यादीत असताना, शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झाला होता. विशेष म्हणजे पहिल्या मंत्रीमंडळापूर्वी देखील ठाकरे गटावर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये शिरसाट सर्वाधिक पुढे होते. एवढंच नाही तर बंडखोरी झाल्यावर पत्र लिहून, स्पष्ट भूमिका मांडणारे शिरसाट पहिले आमदार होते. मात्र असे असताना शिरसाट यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेटिंग लिस्टमध्ये ठेवले होते. त्यानंतर शिरसाट यांनी अनेकदा आपली नाराजी बोलावून दाखवली. 


जो जास्त टीका करेल, त्याला मंत्रीमंडळात संधी?


दरम्यान शिंदे-ठाकरे गटाची लढाई निवडणूक आयोग आणि न्यायालयात सुरु असताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असतानाच हा निकाल आला आहे. त्यामुळे यावरूनच आता शिरसाट प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. इतर शिंदे नेत्यांपेक्षा शिरसाट ठाकरे गटावर टीका करण्यात आघाडीवर आहेत.  आज तर त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख थेट कुत्रा म्हणून, करून टाकला. ठाकरे गटावर जो जास्त टीका करेल त्याला मंत्रीमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा पहिल्या मंत्रीमंडळापूर्वी झाली होती. त्यामुळे तीच गोष्ट लक्षात ठेवून शिरसाट वाटचाल तर करत नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. 


शिरसाट यांची राऊतांवर जहरी टीका...


दरम्यान आज पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी जे काही दोन हजार कोटींचा आरोप लावला आहे, त्यानुसार त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं शिरसाट म्हणाले. त्यामुळे अशा सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे आम्हाला उचित वाटत नाही. 'हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार' अशी अवस्था आहे. तर एखादं कुत्रं पिसाळलं म्हणून, त्याला चावायचं असतं का?, त्याला कोणतेतरी औषध देऊन शांत करू, असेही शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chandrakant Khaire: औरंगाबादच्या शिवसेना भवनावर दावा करणाऱ्या आमदार शिरसाट यांना खैरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले...