Aurangabad Accident News: औरंगाबादच्या वाळूज भागात आज सकाळी भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली असून, ट्रकने एका दुचाकीस्वारांना चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास वाळूज भागातील रांजणगाव शेणपुंजी परिसरातील एनआरबी चौकात हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमाक एमएच 04 एफजे 5288  ने एका दुचाकीला जोरदार धडक देत, दूरपर्यंत चिरडत नेले. ज्यात भावासह दोन सख्ख्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. तर अपघात होताच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिघांचा जागीच मृत्यू , झाला आहे. अपघात झाल्यावर रस्त्यावर काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलीस घटनास्थळी पोहचले असून, मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


बहिण भावाचा जागीच मृत्यू...


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कचरू लोखंडे (वय 20 वर्षे, रा. ओम साईनगर, रांजणगाव) हा गुरुवारी सकाळी मोठी बहीण अनिता ( वय 22 ववर्षे ) आणि लहान बहीण निकिता ( वय 18 वर्षे) या दोघींना दुचाकी (क्रमांक एमएच 21, एएम 6995) वरून त्यांना कंपनीत कामावर सोडण्यासाठी निघाला होता. दरम्यान रांजणगाव फाटा येथून उद्योग नगरीतील रेणुका ऑटो या कंपनीत जात असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास एनआरबी चौकलगत दीपक याच्या दुचाकीला ट्रकने (क्रमांक एम एच 04, एफजे 5288 ) जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघेही बहीण भाऊ गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 


घटनास्थळी गर्दी...


वाळूज परिसरातील एनआरबी चौकात झालेल्या अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच सकाळी कंपनीच्या शिफ्टचा वेळ असल्याने रस्त्यावर देखील येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण दुचाकीस्वारांना रुग्णालयात हलवण्याच्या आधीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवली.  


Aurangabad: मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा महिलेवर हल्ला, दहा ते पंधरा फुटापर्यंत नेले ओढत; गंभीर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु