Aurangabad Water Issue: शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) सतत प्रयत्न करत आहे. त्यासाठी शहरातील विवध भागातील अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आज पुन्हा अशीच काही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध मोहीम पथकाने एकूण 56 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले आहेत. 


दरम्यान आज महापालिका विशेष अनधिकृत नळजोडणी शोध मोहीम पथक क्रमांक एकचे पथक प्रमुख मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे व पथक क्रमांक तीनचे उप आयुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली पथकांनी रेल्वे स्टेशन परिसरात अब्रार कॉलनी,सिल्क मिल कॉलनी येथील मनपाच्या 150 मिमी मुख्य जलवाहिनीवरील एकूण 56 अनधिकृत नळ जोडणी खंडित केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. 


यांनी केली कारवाई 


सदर कारवाईमध्ये उप अभियंता महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता एन. वी. वीर, अमित पंडागळे, रोहित इंगळे पथक अभियंता, संतोष खेडकर, लक्ष्मण शेजवळ, शेख सिराज, अतिक पटेल, शैख शोएब, कृष्णा सोनवणे, शेख कासम, शेख रफीख, मांगीलाल चव्हाण इतर कर्मचारी मो. शरीफ, तमिज पठाण, वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार, उमेश दाने सोबत पोलिस बंदोबस्त मधील कर्मचारी सुरेश चव्हाण, अभय नायर, विजय मोरे आणि श्रीमती बागुल आदींनी पूर्ण केली असल्याची माहिती विशेष पथक यांनी दिली आहे.


व्यवसायिक मालमता सील 


एकीकडे अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात कारवाई करण्यात येत असतानाच, दुसरीकडे शहरातील निवासी व व्यवसायिक मालमत्ताधारक यांच्याकडील थकीत मालमता कर व पाणीपट्टी बाबत सर्व नऊ झोनअंतर्गत सातत्याने करवसुली व मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान आज देखील या पथकाने अशीच कारवाई केली आहे. यात झोन क्र. 05 सहायक आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधववाडी येथील अनिल कुमार चुडीवाल यांचे जनरल शॉपिंग सेंटरवर (गाळा क्र.335) थकीत मालमत्ताकर रक्कम 1 लाख 58 हजार 822 तर, गाळा क्र. 169  इंदिराबाई कोठारे यांचेकडील थकीत मालमताकर रक्कम 45 हजार 243 बाकी असल्याने दुकाने सील करण्यात आली आहे. 


चौघांकडून मालमत्ता जप्ती टाळण्यासाठी भरणा


तसेच एमआयडीसी चिकलठाणा येथे पथक मालमत्ता जप्ती करण्यासाठी गेले असता, इंडस गियर लि. यांनी थकीत मालमत्ता कर रक्कम 97 हजार 750 रुपये, लक्ष्मी अग्नी कम्पोनंट प्रा ली यांनी 2 लाख 44 हजार 99५ रुपये, डेक्कन बॉटलींग अँड डिसलरीज यांनी रक्कम 3 लाख 63 हजार 239 रुपये व मडीलगेकर आर्ट स्टुडिओ यांनी 68 हजार 841  रुपयांचा भरणा केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


म्हाडाची लॉटरी निघाली, 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळानं काढली जाहिरात, 22 मार्चला सोडत