Aurangabad News: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यातील अनेक भागात हाहाकार माजवला आहे. तर 8 ते 10 जुलै या दोन दिवसांत मराठवाड्यातील तब्बल 387 गावांना पुराचा फटका बसला आहे. तर सर्वाधिक नांदेड जिल्ह्यातील 310 गावांना पुराचा फटका बसला असून, अनेक गावांमध्ये अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. तर आज औरंगाबाद जालना या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


या जिल्ह्यात पूरपरिस्थिती... 


तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील 62 गावांना पुराचा फटका बसला आहे, तर नांदेडमधील 310 गावं, बीडमधील 1, लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 2 गावांचा समावेश आहे. तर पूरपरिस्थितीमुळे मराठवाड्यात 160 मोठी तर 30 लहान जनावरे दगावली आहे. तसेच 52 हजार 149  हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत.


पाज जणांचा मृत्यू...


मराठवाड्यात सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकारमध्ये 5 जणांना आपला जीव गमवावे लागले आहे. 8 ते 10 जुलैदरम्यान नांदेडमधील 1 जण, बीडमधील 4  जणांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यातील 4 जन जखमी झाले आहे. तर पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. 


प्रशासन अलर्ट...


औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने, या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांमध्ये कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष करून नदी काठच्या गावांना विशेष काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या 


Flood Situation : पूर आणि अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान 


Maharashtra Rain Update : आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी!


Maharashtra Mumbai Rain : मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा