Aurangabad News: दारूच्या अतिव्यसनाने एखांद्याचे कुटुंब उध्वस्त केल्याच्या बातम्या (News) अधूनमधून समोर येतच असताच. तर याच दारूच्या नशेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना देखील अनेकदा घडत असतात. मात्र औरंगाबादमध्ये बेरोजगारीने हैराण झालेल्या एका 32 वर्षीय तरुणाचे दारूसाठी वांदे होत असल्याने त्याने थेट रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला आहे.
याबाबत तरुणाचे जीव वाचवणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गाव सोडून शहरात आलेल्या शरदने (नाव बदलले आहे) केश कर्तनालयचा (Hair Salon) व्यवसाय सुरु केला होता. कष्टकरी असल्याने शरदच्या व्यवसाय जोमात सुरू होता. परंतु याच काळात त्याला दारूचे व्यसन लगले. पाहता-पाहता शरद दारूच्या एवढ्या आहारी गेला की, परीणाम त्याच्या व्यवसायावर होऊ लागला. पुढे हे प्रमाण वाढले आणि व्यवसाय बंद पडला. दारूसाठी ओळखीच्या लोकांकडून उधारीने पैसे घेण्याची वेळ आली. अशात घराकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने पत्नीसोबत वाद होऊ लागले. त्यातच उसणे पैसे व काम मिळत नसल्याचे दारूचे वांदे होऊ लागले. त्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.
आत्महत्या करण्यापासून रोखले
दारूसाठी पैसे मिळत नाही, त्यात कुठे हाताला कामही मिळत नसल्याने शरद शनिवारी सकाळी संग्रामनगर उड्डाण पुलाजवळील रेल्वे रुळावर (Railway Track) आत्महत्या करण्याच्या विचाराने पोहचला. मनाची पूर्ण तयारी करून शरद गाडीची वाट पाहत होता. याचवेळी ही बाबा स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या श्रीमंत गोर्डे पाटील यांच्यासह इतर नागरिकांनी शरदला रेल्वे पटरीवरून बाजूला करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.
पत्नी घरगुती काम करून संसाराचा गाडा ओढतेय...
यावेळी नागरिकांनी शरदला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याला एक सहा वर्षांची मुलगी असून त्याची पत्नी घरगुती काम करून संसाराचा गाडा ओढत आहे. त्यात शरदला कुठेही काम मिळत नसून, दारूच्या व्यसनी गेल्याने मानसिक तणाव वाढला आहे. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा तो म्हणाला. यावेळी गोर्डे यांच्यासह उपस्थित असल्याने नागरिकांनी त्याला काम देण्याचे आश्वासन देत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. तर यावेळी त्यानेही दारू न पिण्याची शपथ घेत मिळेल तो व्यवसाय करून कुटुंबाला आधार देण्याचा निश्चय केला आहे.
Video Reels: व्हिडिओ रीलवरून झालेल्या वादातून तरुणांचा मैत्रिणीच्या आईच्या गळ्यावर थेट ब्लेडने वार