Deepali Sayed : शिंदे गटात (Shinde Group) सामील होण्याचा निर्णय घेतलेल्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) अजूनही वेटिंगवरच असल्याचे दिसत आहे. आजही त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला नाही. सलग तिसऱ्यांदा आज दिपाली सय्यद वेटींगवर आहेत. बुधवारी (9 नोव्हेंबरला) दिपाली सय्यद यांनी आधी मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली होती की आज प्रवेश होईल, मात्र तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांना भेटले नाहीत. त्यामुळं त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळं आता सय्यद यांचा शिंदे गटात कधी प्रवेश होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आनंद आश्रमात आज प्रवेश होणार होता पण अचानक....
सलग तिसऱ्यांदा आज दिपाली सय्यद वेटींगवर ठेवलं आहे. अद्याप त्यांचा शिंदे गटात प्रवेश झालेला नाही. आज देखील आनंद आश्रम इंथे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, अचानक प्रवेश होणार नाही असे त्यांनी आता कळवले आहे. त्यामुळे सय्यद यांच्या प्रवेशावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
आरोप करत सय्यद यांचा सय्यद शिंदे गटात जाण्याचा निर्णय
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील सलोख्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी बुधुवारी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी थेट रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. मुंबई मनपातील (BMC) खोके 'मातोश्री'वर बंद होण्याची खंत रश्मी ठाकरेंना आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे (Sushma Andhare) चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत", असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला होता. माझा शिंदे गटात प्रवेश होत आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहे. प्रवेशासंदर्भात कसं, काय, कधी ही चर्चा करण्यासाठी भेट होणार आहे. मला शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती स्वीकारेन. मला शिंदे यांनी राजकारणात आणले. म्हणून त्यांच्यासोबत जाते आहे. मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. मी शिंद-ठाकरे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, पण यश नाही आले म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: