2000 Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. तर यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या निर्णयावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


पृथ्वीराज चव्हाण : दोन हजाराच्या नोटबंदीवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "यापूर्वी घेण्यात आलेलं नोटबंदीचा निर्णय जसा बालिश होता, तसाच हा निर्णय बालिश आहे. गेल्यावेळी नोटबंदीचे तीन करणे सांगण्यात आले होते, ज्यात पाकिस्तानमधील दहशतवादी बंद होईल, भ्रष्टाचार बंद होईल आणि काळा पैसा नष्ट होईल असे सांगण्यात आले होते. पण त्यातील एकही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंडघशी पडले. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


संजय राऊत : यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "एक लहरी राजा असतो आणि तो हवेतच निर्णय घेतो. तर प्रजेने त्याच्या मागे जावं अशी त्याची इच्छा आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद कमी होईल म्हणून त्यांनी नोटबंदी केली. पण भ्रष्टाचार तसाच वाढला आहे, काळा पैसा तसाच आहे. सर्वाधिक काळा पैसा भाजपच्या मित्रांकडे आहेत. परदेशातून काळा पैशांचा एक रुपया देखील आला नाही. त्यामुळे यापूर्वी केलेल्या नोटबंदीचं आधी उत्तर द्या आणि त्यानंतर या नोटबंदीचं विश्लेषण करा." 


जयंत पाटील : यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "याच सरकारने दोन हजारांच्या नोटा काढल्या आणि आता हेच सरकार त्या बंद किंवा छापणे बंद करत आहे. असे निर्णय घेतल्याने काय फायदा होणार आहे माहित नाही. सर्वसामान्य लोकांकडे दोन हजारांच्या नोटाच नाहीत. त्यामुळे सरकारने आधी दोन हजारच्या किती नोत्या छापल्या आणि बँकेत किती आहे, किती कॅशमध्ये आहेत याचा हिशोब आज जाहीर करावा. त्यामुळे या नोटा किती परत येतील हे कळेल." 


अशोक चव्हाण : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देखील दोन हजारांच्या नोटबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया आली आहे. "2016 मध्ये एक हजाराची नोट बंद केली आणि दोन हजारांची नोट आणली. त्यामुळे या सहा वर्षात असे काय घडलं की, या दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याची वेळ आली. हा अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा आहे. या मागील हेतू काय आहेत, हे त्यांनाच माहित आहे." "तर निवडणुका जवळ येत असल्याने त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असावा," असे अशोक चव्हाण म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


RBI on 2000 Note:  मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार