Nashik News : नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) आणि पेट्रोल डिलर्स असोसिएशनमधील (Petrol Dealers Association) वाद आता आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण पोलिसांच्या नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला यापुढे आम्ही सहकार्य करणार नसल्याची पेट्रोल डिलर्स असोसिएशनने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 


पेट्रोल डिलर्स असोसिएशनची आक्रमक भूमिका


आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर विनाहेल्मेट वाहनचालकांना सर्रासपणे पेट्रोल दिले जात असल्याचं चित्र नजरेस पडतेय. गुढीपाडव्यापासून विनाहेल्मेट वाहनचालकाला पेट्रोल देणाऱ्या पंपमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन परवाना रद्द करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र पोलिस आयुक्तांची ही भूमिका कायद्याला धरून नसल्याने आम्हाला ती मान्य नसल्याचं असोसिएशनने स्पष्ट केलंय. या निर्णयाविरोधात असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आयुक्त यांच्याकडे सुनावणीसाठी 19 नोव्हेंबर 2021 रोजी अर्ज दाखल केला होता, मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही त्या अर्जावर कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने त्यांचा लेखी निर्णय येत नाही, तोपर्यंत नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिमेत सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


भुजबळ यांची मध्यस्थी देखील अपयशी


या निर्णयाच्या निषेधार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिक शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते, विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात पालकमंत्री छगन भुजबळ यांची मध्यस्थी देखील अपयशी ठरलीय. अशी माहिती मिळत आहे.


नाशिककरांची गैरसोय


दरम्यान मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल पंप बंद असल्यानं नाशिककरांची गैरसोय झाली. शहरभर फिरून ही इंधन मिळत नसल्यानं नागरिकांचा गोंधळ उडाला.  विना हेल्मेट पेट्रोल दिल्यास पपंचालकावर आत्महत्याचा गुन्हा दाखल करण्याचे विधान पोलीस आयुक्तांनी केले होते. पोलिस आयुक्तांच्या निषेधार्थ नाशिक येथील पेट्रोलपंप चालकानं बंद पुकारला आहे. परंतु, पोलीस आणि पंप चालकांच्या नियमांच्या लढाईत सर्वसामान्य नाशिककर भरडला जातोय.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik: मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांचे हाल, पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय


Sanjay Raut : राज ठाकरेंना उशीराने आली अक्कलदाढ, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल