Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
वायुसेना दिवस -
आज भारतीय वायुसेनेचा आज 90 वर्धापन दिवस आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारतात वायुसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वायुसेना दिवस दिल्लीबाहेर साजरा करण्यात येणार आहे. वायुसेनाच्या मैदानावर परेड होणार आहे. चंदीगढमध्ये वायुसेना कसरती करणार आहे.
भारतीय वायुसेना ही जगातील सर्वात शक्तीशाली वायुसेनाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारतीय वायु सेना दलाच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहून शकत नाही. अमेरिका, रशिया आणि चीनक पाठोपाठ भारते मोठे हवाई दल जगात सर्वात मोठे आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमाना आहे. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय वायुसेना म्हणून केली होती. स्वातंत्र्यानंतर त्याची ओळख भारतीय वायुसेना दल म्हणून झाली. परंतु, 1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘वायुसेना दिवस’ म्हणून साजरा होतो.
मुंबईला यलो अलर्ट -
राज्यभरात परतीच्या पावसाचा सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.
शिंदे सरकारला 100 दिवस -
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 100 दिवसांच्या कालावधीत या सरकारने महाविकास आघाडी सरकरचे अनेक निर्णय बदलले. या शंभर दिवसांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. अनेक राजकीय घडामोडी सुद्धा घडताना पाहायला मिळाल्या.
निवडणूक आयोगापुढे शिवसेना भूमिका मांडणार -
निवडणूक आयोगानं शनिवारी उद्धव ठाकरे गटाला आपली भूमिका मांडण्यासाठी दुपारी दोन वाजताची वेळ दिली आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगापुढे होणार आहे. त्या कारवाईला सुरुवात झाली आहे. आज उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगापुढे शिंदे गटाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये पक्षाचे प्राथमिक सदस्यच उरले नाहीत तर मग निवडणूक चिन्हावर दावा कसा? एकनाथ शिंदे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा करू शकत नाहीत. त्यांचं बंड म्हणजे स्वेच्छेने पक्ष सोडल्याची कृती असल्याचं निवडणूक आयोगापुढे शिवसेनेनं म्हटलेय.
भटक्या विमुक्त जमाती संघटनांचं सुवर्ण महोत्सवी अधिवेशन, शरद पवार प्रमुख पाहुणे -
भटक्या विमुक्त जमाती संघटनांचं सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आज नागपुरात होणार आहे. रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. या अधिवेशनात शरद पवार यांना "लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा" अशी उपाधी दिली जाणार आहे. आयोजकांच्या मते या कार्यक्रमात शाहू शहाजी छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर हेही उपस्थित राहणार आहेत... तसेच बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम हे ही या कार्यक्रमात निमंत्रित आहे.
चंद्रपुरात 2 दिवसीय सुर्यांश साहित्य -
आजपासून चंद्रपुरात 2 दिवसीय सुर्यांश साहित्य संमेलन होत आहे, या संमेलनाची सुरुवात सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी ने होणार आहे. आझाद बगीचा ते संमेलन स्थळ असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या सभागृहापर्यंत ही ग्रंथदिंडी निघेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासणे या ग्रंथदिंडी ला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसची सभा -
भारत जोडो अंतर्गत आज कोल्हापुरात काँग्रेसची भव्य सभा आहे. दिग्विजय सिंग, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे या सभेला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस -
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवढणुकीतून अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांनी अर्ज केला आहे. केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद ठरला आहे.
राहुल गांधींची पत्रकार परिषद -
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमवर राहुल गांधी पत्रकार परिषद घेमार आहे. दुपारी एक वाजता कर्नाटकमधील तुरुवेकेरे येथे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.