Nanded Crime : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. एका आठ वर्षाच्या मुलीवर एका माथेफिरू इसमाने अत्याचार केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे


पीडित मुलीने आईला घटनेची माहिती सांगितली


पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्याच्या गावातील एका माथेफिरू इसमाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या घटनेची माहिती सांगितली, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा गुन्हा पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो



अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा गुन्हा 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा' म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. 18 वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला. गेल्या काही वर्षांत महिलांवरील आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत. त्यानुसार, सोळा किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्याची कायदा दुरुस्तीही करण्यात आली.


 


कायद्यातील महत्त्वाच्या गोष्टी


पीडित बालकाचे किंवा बालिकेचे नाव उघड केले जात नाही.
तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस पीडित व्यक्तीच्या घरी साध्या वेशात जातात. 
शक्यतो महिला पोलीस अधिकारी हे निवेदन नोंदवून घेतात.
सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.
न्यायालयात खटला दाखल केल्यावर 'इन कॅमेरा' साक्ष नोंदवली जाते.
कोणत्याही कारणासाठी कोणत्याही बालकाला रात्री पोलीस ठाण्यात थांबवून घेतले जात नाही.
जर पीडित व्यक्ती बालिका असेल तर स्त्री डॉक्टरांकडूनच वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते.
पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी पालकांच्या किंवा बालकाचा विश्वास असलेल्या प्रौढाच्या उपस्थितीत केली जाते.


 



पोक्सो कायद्यात काय सुधारणा करण्यात आल्या?


2018 साली भारतातील कथुआ आणि उन्नाव येथे बालिकांवर बलात्कार झाल्याच्या घटनांनंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने पोक्सो कायद्यात बदल करण्यात आले. त्यानुसार आता बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येईल. 16 वर्षांवरील मुलींवर बलात्कार केल्यास कमीत कमी 10 ते २० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.


 


ही बातमी वाचा: