Teddy Day 2024 : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, पण त्यापूर्वीच 7 फेब्रुवारीपासून विविध डे साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीला रोज डेपासून (Rose Day) होते, त्यानंतर प्रपोज डे (Propose Day), मग चॉकलेट डे (Chocolate Day) आणि त्यानंतर 10 फेब्रुवारीला टेडी डे (Teddy Day) साजरा केला जातो.


10 फेब्रुवारी म्हणजे टेडी डे


टेडी डे 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना टेडी बेअर देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. आज तुम्हीही तुमच्या खास व्यक्तीला एक सुंदर टेडी बेअर भेट देऊ शकता. मुलायम आणि गोंडस टेडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच मनं जिंकतो. टेडी बेअर पाहून चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. यंदाच्या टेडी डेला तुम्ही देखील तुमच्या लव्ह पार्टनरला टेडी गिफ्ट करू शकता.


गोड पद्धतीने तुमच्या भावना व्यक्त करण्याचा योग्य दिवस


मुलींना तर टेडी खूप आवडतो. जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला इम्प्रेस करायचं असेल किंवा तुमच्या क्रशसमोर तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांना टेडी बेअर भेट द्या. प्रत्येक रंगाच्या टेडी बेअरमागे एक विशेष अर्थ असतो, त्यामुळे टेडी बेअर खरेदी करताना आधी त्या रंगाच्या टेडी बेअर मागील अर्थ जाणून घ्या आणि नंतरच ते गिफ्ट करा. एक क्युट असा टेडी बेअर तुमच्या लव्ह लाईफची चांगली सुरुवात घडवून आणू शकतो. वेगवेगळ्या रंगांच्या टेडी बेअरचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही मैत्रीचे तर, काही प्रेमाचे प्रतीक आहेत. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला टेडी बेअर भेट देण्याचा विचार करत असाल, तर आधी जाणून घ्या की कोणता टेडी बेअर तुमच्या मनातील भावना योग्यरित्या त्याच्यापर्यंत पोहोचवेल.


कोणत्या रंगाच्या टेडीचा काय अर्थ? (Teddy Bear Meaning behind Colours)


लाल रंगाचे टेडी बेअर - जर तुम्ही एखाद्याला लाल रंगाचे टेडी बेअर दिले, ज्याने हातात हृदय पकडलं आहे, तर याचा अर्थ असा आहे की टेडी देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आय लव्ह यू म्हणत आहात. असे लाल रंगाचे टेडी बेअर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला टेडीसोबत चॉकलेट मिळाले असेल तर समजून घ्या की, तुम्हाला त्या व्यक्तीसोबत कायमचे नाते प्रस्थापित करायचे आहे.


गुलाबी रंगाचे टेडी बेअर- जर तुम्ही एखाद्याला गुलाबी रंगाचे टेडी बेअर भेट देत असाल तर ते मैत्रीचे प्रतीक आहे. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला तुमचा सहवास आवडतो आणि तो तुमच्याशी मैत्री करू इच्छित आहे. जर टेडीने एखादे पत्र पकडले असेल तर समजून घ्या की, समोरच्या व्यक्तीला मैत्रीचे नाते प्रेमात बदलायचे आहे आणि प्रत्येक पावलावर त्याला तुमची गरज वाटते.


तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे टेडी बेअर - जर तुम्हाला कोणी तपकिरी किंवा गडद पिवळ्या रंगाचे टेडी बेअर गिफ्ट करत असेल आणि त्यासोबत लव्ह लेटरही असेल तर याचा अर्थ असा की, तुमचा प्रियकर तुम्हाला मिस करत आहे. जर कोणी तुम्हाला पिवळ्या रंगाचा टेडी गिफ्ट करत असेल तर ते घट्ट मैत्रीचे प्रतीक आहे.


टेडी गिफ्ट ऑप्शन्स (Teddy Day Gift Options)


टेडी डेला तुम्ही यापैकी कोणतेही टेडी गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुम्हाला बाजारात अनेक टेडी ऑप्शन गिफ्ट्स म्हणून मिळतील. यामध्ये तुम्हाला टेडीसोबत चॉकलेट, गिफ्ट हॅम्पर वैगेरे मिळतील. तुम्हाला मोठा टेडी बेअर गिफ्ट करायचा नसेल तर तुम्ही टेडी बेअरच्या आकाराची की चेन, टेडी बेअर पेंडेंट किंवा ब्रेसलेट देखील गिफ्ट देऊ शकता.


हेही वाचा:


Teddy Day 2024 : यामुळेच टेडी डे सुरू झाला,ही कथा आहे रंजक,जाणून घ्या