Maharashtra Mumbai Rain Live : खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या राज्यात तैनात  

Maharashtra Mumbai Rain Live  : मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jul 2022 08:45 PM
नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या उघडीपी नंतर संध्याकाळ पासून दमदार पावसाची हजेरी

नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या उघडीपी नंतर संध्याकाळ पासून दमदार पावसाची हजेरी.


एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात चांगल्या पावसाची सुरुवात.



अँकर:पावसाळा सुरू होऊन जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात पावसाने आपले खाते उघडले नव्हते. तर जून महिना  संपूर्ण कोरडा गेल्या त्यानंतर आता जुलै  महिन्यात नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज संध्याकाळी काळ्याकुट्ट ढगांनी वर्दळ करत  जोरदार पावसाला सुरुवात केलीय.नांदेड शहरात अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे वाहतुकीचीही त्रेधातिरपीट होऊन नागरिकांची तारांबळ उडालीय.तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर,भोकर,उमरी,हिमायतनगर, माहूर,किनवट, हदगाव,बिलोली, देगलूर तालुक्यात पाऊस धुवांधार पाऊस बरसतोय.त्यामुळे  शेतकऱ्यांची दुबार पेरणी टळून पिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान पावसा अभावी खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तर गेल्या पाच महिन्या पासून उकड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन दिलासा मिळालाय.

Rain Update : पुढील पंधरा दिवस परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद
पावसाचा अलर्ट लक्षात घेऊन चौपदरीकरणाच्या कामात अर्धवट स्थितीत कटाई केलेला परशुराम घाट आणि घाटातील डोंगरावरील वरच्या बाजूला भेगा पडल्याने घाट वाहतूकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने पुढील 15 दिवस परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटातील दरड खाली येण्याचे सत्र सुरुच आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

 

लोटे - चिरणी - कळबस्ते - चिपळूण मार्गाने.. लाईट वेट वाहने

 

चिपळूण वरुन कुंभार्ली घाट मार्ग हेवी वेट (अवजड) वाहने वळवण्यात येणार आहेत..

 

पाऊस कमी होताच घाटाची दुरुस्तीची कामे केले जातील.
Rain Update : पुढील पंधरा दिवस परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद
पावसाचा अलर्ट लक्षात घेऊन चौपदरीकरणाच्या कामात अर्धवट स्थितीत कटाई केलेला परशुराम घाट आणि घाटातील डोंगरावरील वरच्या बाजूला भेगा पडल्याने घाट वाहतूकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने पुढील 15 दिवस परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटातील दरड खाली येण्याचे सत्र सुरुच आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

 

लोटे - चिरणी - कळबस्ते - चिपळूण मार्गाने.. लाईट वेट वाहने

 

चिपळूण वरुन कुंभार्ली घाट मार्ग हेवी वेट (अवजड) वाहने वळवण्यात येणार आहेत..

 

पाऊस कमी होताच घाटाची दुरुस्तीची कामे केले जातील.
Rain Update पुढील पंधरा दिवस परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद.. 
 

 

पावसाचा अलर्ट लक्षात घेउन..चौपदरीकरणाच्या कामात अर्धवट स्थितीत कटाई केलेला परशुराम घाट आणि घाटातील डोंगरावरील वरच्या बाजूला भेगा पडल्याने घाट वाहतूकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला.. 

 

कारण गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटातील दरड खाली येण्याचें सत्र सुरुच आहे.. 

 

तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.. 

 

लोटे - चिरणी - कळबस्ते - चिपळूण मार्गाने.. लाईट वेट 

तर 

चिपळूण वरुन कुंभार्ली घाट मार्ग हेवी वेट (अवजड) वाहने वळवण्यात येणार आहेत..

 

पाऊस कमी होताच घाटाची दुरुस्तीची कामे केले जातील..
पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई दवारे देण्यात आला आहे. मॉन्सूनच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची नोंद झाली आहे आणि पुढील पाचही दिवस पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या राज्यात तैनात  

Mumbai : भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील 3 दिवस म्हणजे दिनांक 8 जुलै  2022 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार ( 64 मिमी ते 200 मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आ हेत.

डोंगराचा भाग कोसळल्यानं घरांचं नुकसान, 3 जखमी

चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगराचा काही भाग पडला. चेंबूर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि चुनाभट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एक तरुण जखमी झाला आहे. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांची समुद्र किनाऱ्याजवळ गस्त

पावसाळा सुरु झाल्यामुळं लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी, चित्रांवर क्लिक करण्यासाठी आणि पाणी आणि लाटांसह रील तयार करण्यासाठी किनारपट्टीजवळ येतात. धोक्याचा भाग पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी संबंधित किनारपट्टीवर गस्त वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई शहराच्या किनारपट्टीवरील 16 वेगवेगळ्या ठिकाणी सतर्कता वाढवली आहे. जिथे पावसाळ्यात सेल्फी घेताना लोकांचा जीव धोक्यात येऊन अपघात होतात. 

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 141.09 मिमी पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 141.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खालापूर येथे सर्वाधिक 201 , पेण 192, तळा 177, माथेरान 162.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रोहा 155, पनवेल  151, सुधागड 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात चांगला पाऊस

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. पुण्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळं पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे चारही धरण क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळं या धरणाची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांवर जे पाणी कपात लागू करण्यात आली आहे ती लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. 



 प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक बंद

सातारा जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासूनच्या पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे प्रतापगड येथील अफजलखान कबरी जवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली आहे. प्रतापगडकडं जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. 



सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात

सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात जाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मिमी पावसाची नोंद झाली असून, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. कृष्णा नदी सध्या पात्रातूनच वाहत असून पाणी पातळी 6 फुटांच्या जवळ गेली आहे.




यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, लिंगती येथील पर्यायी पूल गेला वाहून

Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं झरी तालुक्यातील लिंगती येथील पर्यायी पूल गेला वाहून गेल्याची घटना घडली. वणी पाटणबोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. झरी तालुक्यातील वणी पाटण बोरी मार्गावरील लिंगती येथील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरg आहे. मात्र पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूला मुरुम टाकून छोटा पुल बनवण्यात आला होता. मात्र झरी तालुक्यात मुसळधार पावसामुळं उभा केलेला पूल वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पूल नसल्याने पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं तो मार्ग बंद करण्यात आला आहे. आजूबाजूच्या खेड्यापाड्याचा संपर्क तुटला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन काय पर्यायी व्यवस्था करतील या कडे लोकांचे लक्ष लागले आहे.




 


 


 

कोयना परिसरात यावर्षातला उच्चांकी पाऊस

कोयना परिसरात यावर्षातला उच्चांकी पाऊस पडला आहे. नवजा 244 मिलिमीटर तर कोयनेत 154 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  महाबळेश्वरातही 194 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. 21 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु तर कोयना धरणात आणखी दोन टीएमसी पाणी साठा वाढला आहे. कोयना धरणात आता 18 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.



वसई विरारसह नालासोपारामध्ये जोरदार पाऊस, नालासोपाऱ्यातील शाळांना सुट्टी

वसई विरार आणि नालासोपारामध्ये रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं सध्या शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. तर वसईच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नालासोपारातील सेंट्रल पार्क, नगिनदास पाडा, आचोले रोड, गाला नगर, स्टेशन परिसर, एस.टी. डेपो, तसेच विरारच्या विवा कॉलेज, भाजी मार्केट परिसर इत्यादी ठिकाणी पाणी साचलं आहे. सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी पाणी अजून बऱ्याच ठिकाणी ओसरलं नाही. तर वसईच्या पश्चिम पट्टयात सखल भागात पाणी साचल्याने कार्मलाईट शाळा, सेंट ऑगस्टीन स्कूल, विद्या विकासनी या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर, पाणी पातळी पोहोचली 30 फुटांच्या वर

Kolhapur Rain : सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांच्या वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं प्रशासनानं तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  



पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rain Live  : जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर  वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसानं हजेरी लावली आहे. 


दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 





कोकणात मुसळधार


रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड  तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.  रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली आहे. 




कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.