Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jul 2022 07:43 PM
पाली, रोहा, खालापूर येथील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

पाली, रोहा, खालापूर येथील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.  अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.  अंबा 8.80  मीटर, कुंडलिका 23.75 मीटर, पाताळगंगा 20.55 मीटर एवढया पाणी पातळीची नोंद.

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

PUNE | बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला असं समजल्या जातं.

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर कायम आहे. विशेष म्हणजे विसर्गात वाढ झाल्यास पुराचे पाणी थेट सराफ बाजार, भांडी बाजार आणि जूने नाशिक परिसरात शिरण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने प्रशासनाकडून नागरिकांसह व्यावसायिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. भांडी बाजारातील व्यावसायिकांनी आता दुकानातील साहित्य हलवण्यास सुरुवात केली असून दुकाने त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

कल्याण मधील दुर्गाडी खाडी परिसरात NDRF ची प्रात्यक्षिके

कल्याण मधील दुर्गाडी खाडी परिसरात एनडीआरएफ ची प्रात्यक्षिके झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पूर परिस्थिती उद्भवते. या पार्शवभूमीवर कल्याण मध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. 25 जणांचे हे पथक अत्याधुनिक सामुग्रिने सज्ज आहे. आज कल्याण दुर्गाडी खाडी परिसरात या पथकाने मोकड्रील केलं. आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करणार याबाबत प्रत्याक्षिक सादर करण्यात आली.

धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग

Dhule Rain : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. साखरी माळमाथा परिसरात झालेल्या पावसामुळं अक्कलपाडा धरणात देखील जलसाठा वाढला आहे. अक्कलपाडा धरणातून तब्बल 13 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला आहे. यामुळं नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेला असून काही तासात शहरातील लहान पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीच्या पुलावर एनडीआरएफ तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करु नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. 

ठाणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ठाणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्यात खड्डे बुजवण्याचं काम सुरु असल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाण्याहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर कोंडी झाली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, इरई धरणातून विसर्ग सुरु

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या इरई धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं इरई धरणाचे 3 दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आल्याने इरई नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळं चंद्रपूर प्रशासनाकडून इरई नदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर, चंदई, चारगाव आणि आणि लभानसराड हे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. चंदई आणि चारगाव हे इरई धरणाच्या कॅचमेंट एरिया मध्ये असल्याने इरईच्या पाण्यात मोठी वाढ होत आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर मुसळधार पाऊस, माळेगाव घाटात दरड कोसळली

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळं सापुतारा परिसरातील माळेगाव घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळं काल सायंकाळपासून घाटातील वाहतूक ठप्प असून सुरगाणामार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. गुजरात राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दोन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यानं दगड गोट्यासह झाडं-झुडपं ही खाली कोसळली आहेत. दरम्यान सर्व वाहतूक चिराई घाटाकडून वळवण्यात आली असून सापुतारा घाट लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.



यंदाच्या आषाढी यात्रेत 19 भाविकांनी गमावले जीव, 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवले

यंदाची  आषाढी यात्रा विक्रमी होती तशी पावसाच्या संततधारेने भाविकांना त्रासदायक देखील ठरली. यंदा चंद्रभागेच्या असलेल्या मुबलक पाण्यामुळे अनेक भाविक बुडाल्याच्या घटना समोर येत असताना 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवण्याचे काम प्रशासनाने नेमलेल्या रेस्क्यू टीमने केले. मात्र दुर्दैवाने चार भाविकांचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. याचसोबत यावेळी केवळ एकाच प्राणघातक अपघात घडला ज्यामध्ये 2 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र पावसाची संततधार  आणि तुफानी गर्दी अशा परिस्थितीत तब्बल 13 भाविकांना पंढरपूर शहरात मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेला आलेले असताना काल एका दिवसांत प्रशासनानं तब्बल 500 टन घाण कचरा गोळा केला आहे. अजूनही शहरात पाच ते सात भाविक असून चंद्रभागेच्या पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी रेस्क्यू टीमच्या बोटी गस्त घालत आहेत. 

यंदाच्या आषाढी यात्रेत 19 भाविकांनी गमावले जीव, १०० पेक्षा जास्त भाविकांना वाचवले

यंदाची  आषाढी यात्रा विक्रमी होती तशी पावसाच्या संततधारेने भाविकांना त्रासदायक देखील ठरली. यंदा चंद्रभागेच्या असलेल्या मुबलक पाण्यामुळे अनेक भाविक बुडाल्याच्या घटना समोर येत असताना 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवण्याचे काम प्रशासनाने नेमलेल्या रेस्क्यू टीमने केले. मात्र दुर्दैवाने चार भाविकांचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. याचसोबत यावेळी केवळ एकाच प्राणघातक अपघात घडला ज्यामध्ये 2 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र पावसाची संततधार  आणि तुफानी गर्दी अशा परिस्थितीत तब्बल 13 भाविकांना पंढरपूर शहरात मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेला आलेले असताना काल एका दिवसांत प्रशासनानं तब्बल 500 टन घाण कचरा गोळा केला आहे. अजूनही शहरात पाच ते सात भाविक असून चंद्रभागेच्या पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी रेस्क्यू टीमच्या बोटी गस्त घालत आहेत. 

यंदाच्या आषाढी यात्रेत 19 भाविकांनी गमावले जीव, १०० पेक्षा जास्त भाविकांना वाचवले

यंदाची  आषाढी यात्रा विक्रमी होती तशी पावसाच्या संततधारेने भाविकांना त्रासदायक देखील ठरली. यंदा चंद्रभागेच्या असलेल्या मुबलक पाण्यामुळे अनेक भाविक बुडाल्याच्या घटना समोर येत असताना 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवण्याचे काम प्रशासनाने नेमलेल्या रेस्क्यू टीमने केले. मात्र दुर्दैवाने चार भाविकांचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. याचसोबत यावेळी केवळ एकाच प्राणघातक अपघात घडला ज्यामध्ये 2 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र पावसाची संततधार  आणि तुफानी गर्दी अशा परिस्थितीत तब्बल 13 भाविकांना पंढरपूर शहरात मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेला आलेले असताना काल एका दिवसांत प्रशासनानं तब्बल 500 टन घाण कचरा गोळा केला आहे. अजूनही शहरात पाच ते सात भाविक असून चंद्रभागेच्या पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी रेस्क्यू टीमच्या बोटी गस्त घालत आहेत. 

भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरण 50 टक्के भरली

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग वाढल्याने भंडारदरा आणि निळवंडे हे दोन्ही धरण निम्मे भरले आहे. तसेच अकोले तालुक्यातील टिटवी लघु पाटबंधारे प्रकल्प सोमवारी सायंकाळी 6 वाजता पुर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. टिटवी जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून निळवंडे धरणात नवीन पाणी येऊ लागला आहे. गेल्या आठवड्यापासून घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे या भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक छोटी धरण ओव्हरफलो झाली असून परिसरात भातआवणीस वेग आला आहे. 

गडचिरोलीत 1 महिन्याच्या बाळासह 70 हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं

गडचिरोलीत 1 महिन्याच्या बाळासह 70 पेक्षा जास्त नागरिकांना पूर परिस्थितीतून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्लीला लागून असलेल्या नागेपल्लीत पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तिथे अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. पोलीस प्रशासनाकडून पहाटे 5 वाजल्यापासून बचावकार्य सुरु आहे. यामध्ये 1 महिन्यांच्या बाळासह अन्य 70 पेक्षा जास्त नागरिकांना रेस्क्यूब बोटव्दारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 



गडचिरोलीत पावसाचा हाहाकार, आलापल्ली शहरात पूर

गडचिरोलीत पावसानं हाहाकार घातला आहे. जिल्ह्यातील आलापल्ली शहरात पूर आला आहे. त्यामुळं तेथील काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही गावातही पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.




  

खडकवासला धरण 100  टक्के भरले

पुण्यातील खडकवासला धरण 100  टक्के भरले आहे. हे धरण भरल्यानंतर आता  3400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग धरणाच्या चार दरवाज्यातून नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे.

धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर

Dhule rain : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. साखरी माळमाथा परिसरात झालेल्या पावसामुळं अक्कलपाडा धरणात देखील जलसाठा वाढला आहे. अक्कलपाडा धरणातून तब्बल 13000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग 15 नदी पात्रात करण्यात आला असून यामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेला असून काही तासात शहरातील लहान पूल देखील पाण्याखाली जाणार आहे. नदीच्या पुलावर एनडीआरएफ तसेच अग्निशमक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करु नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. 



अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सकाळपासून धरणातून 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर अलमट्टी धरणात गेल्या 24 तासात एक लाख 4 हजार क्युसेक्स पाण्याची आवक झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानं कर्नाटककडून अलमट्टी धरणातून हा विसर्ग वाढवला आहे. याआधी 50 हजार क्युसेक्सचा विसर्ग होता सुरु होता. 



नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण ओव्हर फ्लो

संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हातनोरे, निळवंडी, पाडे, वलखेड या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.



पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Palghar rain: पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असून, याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वहायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळं नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडूनही पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. 



लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी पाऊस, गेल्या 24 तासात 220 मिलिमिटर पावसाची नोंद

Lonavla Rain : लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस कोसळला आहे. इथं गेल्या 24 तासात 220 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत 1 हजार 522 मिलिमिटर पाऊस बरसला आहे. गेल्या सहा दिवसात 952 मिलिमिटर पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. परिणामी लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील निसर्ग बहरुन गेला आहे. जो पर्यटकांना आकर्षित करु लागला आहे. मात्र सध्याचा पावसाचा जोर पाहता पर्यटकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. पावसाचा जोर कमी होण्याची त्यांनी थोडी प्रतीक्षा करायला हवी.



लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी पाऊस, गेल्या 24 तासात 220 मिमी पावसाची नोंद

Lonawala Rain : लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस कोसळला आहे. इथे गेल्या चोवीस तासात 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 1522 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. यापैकी गेल्या सहा दिवसातंच 952 मिलिमीटर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरलेला दिसत आहे. परिणामी लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील निसर्ग बहरुन गेलाय, जो पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. मात्र सध्याचा पावसाचा जोर पाहता पर्यटकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. पावसाचा जोर कमी होण्याची त्यांनी थोडी प्रतीक्षा करायला हवी.

पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच, धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

Palghar rain : पालघर जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या पावसाने आत्ता थोडीशी विश्रांती घेतली असली तरीही रिपरिप सुरुच आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यासह सर्वच भागात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत.  जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या  सूर्या आणि वैतरणा, पिंजाळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धामणी धरणात पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.



परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस, प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ

Parbhani Rain : परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस सुरु आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. येलदरीत 2.14 टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्के वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरु झाला मात्र मागच्या सलग पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसतोय. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना हवा असलेला मुर पाऊस यंदा पडतोय. त्यामुळं पिकांची वाढ चांगली होतेय. तसचं येलदरी व लोअर दुधना प्रकल्प क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. 



परभणीत सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार, प्रकल्पातील पाणीसाठा वाढला; येलदरीत 2.14 टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्के वाढ

Parbhani Rains : परभणी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरु झाला मात्र मागच्या सलग पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना हवा असलेला मूर पाऊस यंदा पडत आहे, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. तसचं येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्प क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने येलदरीत 2.14 टक्के एवढा पाणी साठा वाढला आहे तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्के एवढी वाढ झाली आहे.

मराठवाड्यात 387 गावांना पुराचा वेढा, हिंगोली आणि नांदेडला सर्वाधिक फटका

मराठवाड्यात 8 ते 10 जुलैला झालेल्या जोरदार पावसानं 387 गावांना पुराचा वेढा पडला आहे. यात हिंगोलीतील 62, नांदेडमधील 310, बीडमधील 1, लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 2 गावांचा समावेश आहे. या दोन दिवसात 160 मोठी, तर 30 लहान जनावरे दगावली आहेत. तर 52 हजार 149 हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, 10 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. 8 पुलांचे नुकसान झाले आहे. तर 5 लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर बीडमध्ये 4 जण जखमी झाले आहेत.




 

तळोजा, खारघर परिसरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी पाणी साचलं

Taloja Rains : तळोजा, खारघर परिसरात काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस देखील जोरदार असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाची संततधार, पाणी न साचल्याने मोठा दिलासा

Vasai Virar Rains : वसई-विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर रिमझिम पावसासह अधूनमधून मुसळधार पाऊस बरसत होता. सकाळच्या वेळेत मात्र पावसाची संततधार सुरु आहे. पाऊस जरी सुरु असला तरी शहरातील सकल भागात कुठेही पाणी साचले नसल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना एक दिलासा मिळाला आहे. तसेच विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल सेवाही सुरळीत आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच, नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले

Palghar Rains : पालघर जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर ओसरला असला तरीही रिपरिप सुरुच आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यासह सर्वच भागात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सूर्या आणि वैतरणा, पिंजाळ नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धामणी धरणात पाण्याची पातळीत ही वाढ झाली आहे. 

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट, अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

Mumbai Rains : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. मुंबईत काल रात्री अधूनमधून पाऊस पडत होता. मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान अद्याप तरी पाणी माहिती समोर आलेली नाही.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात लका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही जोरदार पाऊस झाला नाही.


 

पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्यातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम  या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत पूरस्थितीची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली. 


गडचिरोलीत पुढचे तीन दिवस रेड अलर्ट 


गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 3 दिवसाचा रेड अलर्ट जारी केला होता. पहिल्या दिवशी जिल्हाभर रिमझिम पाऊस पडला. मात्र रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आलापल्ली गावाला लागून असलेल्या नाल्यांना  पूर आला असून पुराचे पाणी अनेक घरात शिरलं आहे. आलापल्ली गावाला चारही दिशेनं पाण्यानं वेढा दिला आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना मध्यरत्री घरातील सामान, गाडी व इतर वस्तू घेऊन सुरक्षितस्थळी जावे लागले. 


नंदूरबार पाऊस


हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन, नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. जिल्ह्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



अकोला आणि वाशिममध्ये जोरदार पाऊस


गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळं अकोला जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. बाळापूर तालुक्यातल्या कारंजा रमजानपुरचा पानखास नदीवरील लघुप्रकल्प 100 टक्के भरला आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने अंत्री परिसरात पानखास नदीला पूर आला आहे. तसेच
वाशिम जिल्ह्यात सकाळपासून मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तिथे सध्या दाट ढगाळ वातावरण असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.



वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा


हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार, 14 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दिनांक 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मीमी. म्हणजे 42.9 टक्के (जुन ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


यवतमाळ पाऊस


फुलसावंगी ते ढाणकी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सध्या सुरु आहे. ठिकठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरु आहे. त्या ठिकाणी पर्यायी बनवलेला पुल पावसाने वाहून गेला आहे. मुसळधार पावसाने येथील ढाणकी ते फुलसावंगी रस्त्यावरील पर्यायी पूर वाहून गेला. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.