मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम 14 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होऊन ते मंगळवार 15 मार्च 2022 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कालावधीत महानगरपालिकेच्या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.
जी/ दक्षिण विभाग : डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग या भागात सोमवारी, 14 मार्च 2022 रोजी दुपारी 2.30 ते दुपारी 3.30 वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा आणि दुपारी 3.30 ते सायंकाळी 7 वाजता पाणीपुरवठा होणार नाही
जी/उत्तर विभागः संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग या भागात सोमवारी 14 मार्च 2022 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 तसेच सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता पाणीपुरवठा होणार नाही
जी/दक्षिण विभागः ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बी.डी.डी., सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग या भागात मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी पहाटे 4.30 ते सकाळी 7.45 वाजता या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही
जी/दक्षिण विभागः धोबीघाट, सातरस्ता -मंगळवारी 15 मार्च रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 वाजता डिलाई रोड पुरवठा भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे
त्यामुळे सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.