MNS Leader Tweet Brij Bhushan and Sharad Pawar Photo : अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात येतोय. या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार (Sharad Pawar) -सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकत्र पाहायला मिळतायत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र या फोटोची एबीपी माझा पुष्टी करत नाही. तसंच यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. 


मनसेचे सचिन मोरे यांनी एक ट्वीट केलं आहे. याट्वीटमध्ये त्यांनी बृजभूषण सिंह आणि शदर पवार यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…"



मनसे नेते गजानन काळे यांनी हे ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, ""ब्रिज" चे निर्माते ... सुज्ञास अधिक सांगणे न लगे ... ( फोटो झूम करून पाहावा...)" असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 



दरम्यान, मनसे नेत्यांकडून ट्वीट करण्यात आलेल्या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार-सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळतायत. हा फोटो 2018 सालचा मावळमधील एका कार्यक्रमातील असल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता, असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दुसरीकडे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मनसेने शेअर केलेल्या या फोटोची एबीपी माझा पुष्टी करत नाही.